4 May 2024 9:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक खरेदी करून श्रीमंत व्हायचय? विकास इकोटेक शेअर्स आज 19.48% तेजीसह अप्पर सर्किटवर

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | नुकतीच भारतात G-20 परिषद पार पडली आहे. विविध देशाचे नेते भारत भेटीवर आले होते आणि या G-20 बैठकीत ठरल्याप्रमाणे भारत विविध देशांसोबत आर्थिक करार करणार आहे. सध्या भारतीय शेअर बाजाराने परताव्याचा आणि मूल्यांकनाच्या बाबतीत अमेरिका आणि चीनला देखील मागे टाकले आहे. याचा सकारात्मक परिणाम आपण शेअर बाजारात पाहू शकतो.

भारतीय शेअर बाजारातील केवळ मोठे नाही तर लहान पेनी स्टॉकदेखील जबरदस्त कमाई करून देत आहेत. विकास इकोटेक लिमिटेड या कंपनीचे शेअर्स तर गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. शुक्रवार दिनाक 8 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 18.18 टक्के वाढीसह 3.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी विकास इकोटेक शेअर्स 19.48% तेजीसह (NSE) 4.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसात विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची कामगिरी पाहिली तर तुम्हाला समजेल की हा स्टॉक मल्टीबॅगर परतावा कमावून देतो. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 369 कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 4.15 रुपये होती. तर नीचांक परकी किंमत 2.35 रुपये होती. विकास इकोटेक लिमिटेडने नुकताच आपले 5 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. कंपनीने 31 मार्च 2024 पर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. सप्टेंबर 2021 नंतर आतापर्यंत विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने 105.2 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीवर एकूण 161 कोटी रुपये कर्ज होते, ज्यातून फक्त 55 कोटी कमी शिल्लक राहिले आहे. मागील 24 महिन्यांत विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने आपले जवळपास 66 टक्के कर्ज परतफेड केले आहे. या पेनी स्टॉक कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत खूप परतावा कमावून दिला आहे. आता कर्ज परतफेडीच्या बातमीने या कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत आले आहेत. जर ही कंपनी पूर्णपणे कर्जोमुक्त झाली तर कंपनीच्या निव्वळ नफ्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price today on 11 September 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x