29 April 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Gold Rate Today | बापरे! सोन्याच्या दरांमध्ये सलग पडझड, आजही भाव घसरले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सातत्याने होत असलेल्या घसरणीनंतर बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 58500 रुपयांच्या पुढे गेला आहे. याशिवाय चांदीच्या दरातही आज वाढ पाहायला मिळत आहे. जर तुमचाही दागिने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आज उत्तम संधी आहे. (Gold Price Today)

एमसीएक्सवर दर काय आहेत?

मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 58621 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 72338 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याची किंमत किती?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58605 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58657 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ५२ रुपयांनी घसरला आहे.

उच्चांकी पातळीपासून सोन्याचा भाव किती स्वस्त?

सध्या उच्चांकी पातळीपासून सोन्याचा भाव 2,980 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 72510 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 72140 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रतिकिलो ३७० रुपयांची वाढ झाली आहे.

जाणून घ्या तुमच्या शहराचे दर

तुम्हालाही तुमच्या शहरातील सोन्याचे दर तपासायचे असतील तर तुम्हाला फक्त एका नंबरवर कॉल करावा लागेल. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही फक्त 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. ज्या नंबरवरून तुम्ही मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर

* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54300 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54330 रुपये, 24 कॅरेट सोने : 59260 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54300 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54330 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54300 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54300 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54330 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54300 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54300 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54300 रुपये, 24 कॅरेट सोने : 59230 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 23 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(203)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x