26 April 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

फडणवीसांना ट्रोलिंग थांबवा अन्यथा भाजप कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील

मुंबई, २ मे: दोन दिवसांपूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र, प्रसार माध्यमांचं स्वातंत्र आणि समाज माध्यमांवरील सामान्य लोकांचं मत प्रदर्शन करण्याचं स्वातंत्र यावरून राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोषारी यांची भेट घेणारे भाजपचे नेते आता फडणवीसांवर होणाऱ्या ट्रॉलिंग वरून पोलिसांकडे तक्रार दाखल करून आले आहेत. त्यामुळे भाजपची संभ्रमावस्था वाढत असल्याचं मत सत्ताधारी व्यक्त करत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केलं जात असून ट्रोल करणाऱ्यांना रोखलं जावं अशी मागणी भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा परमबीर सिंह यांच्या भेटीला पोहोचले होते.

अनेक वेळा अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील हेही आम्ही नम्रपणे सांगितलं,” असल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे एकूण दोन्ही बाजू पाहता आता सत्ताधारी समर्थक आणि विरोधी पक्षातील समर्थकांमध्ये समाज माध्यमांवर वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

News English Summary: Former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis is being trolled in offensive language on social media and BJP leaders have demanded that Commissioner of Police Parambir Singh be stopped.

News English Title: BJP Leaders Meet Mumbai Police Commissioner Demanding Action Against Trollers on social media News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x