महत्वाच्या बातम्या
-
कोरोना योद्धे असा शाब्दिक गौरव करुन त्यांच्या समस्या सुटणार नाहीत - अमित ठाकरे
राज्यात सध्या कोरोनाविरुद्ध निकराची लढाई सुरू आहे. या लढाईत डॉक्टर्स आणि नर्सेस आघाडीवर आहेत. अत्यंत जोखमीचं हे काम असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे असंही म्हटलं जात आहे. मात्र राज्य सरकार आर्थिक संकटात असल्याने या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारनेही अशी मागणी होत असल्याने पगार पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. अमित ठाकरे यांनी नर्सेसच्या पगाराबद्दली फेसबुक पोस्ट लिहून अशीच मागणी केली आहे. थोडी संवेदनशीलता दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजगृह तोडफोड प्रकरणी एका संशयिताला अटक, राजगृहला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण
राजगृहाला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुढील ३ महिने शिवभोजन थाळी १० वरुन ५ रुपयांवर, मंत्रिमंडळ बैठकीतील ९ निर्णय
महाविकास आघाडी प्रणित ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. (Maharashtra cabinet Decisions) कोरोना आणि अनलॉकिंगच्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 9 निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे आणखी तीन महिने शिवभोजन थाळीची किंमत 10रुपयांवरुन 5 रुपयांवर करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी अवघ्या 5 रुपयांत मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्य लोकं व शिवसैनिकांचाही कोरोनाने जीव जातोय आणि मुख्यमंत्री राजकीय सौदेबाजीत
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आल्याचं म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
भावाचे ७ नगरसेवक फोडणाऱ्याला या ५ जणांना परत घेताना लाज वाटेल का?
तीन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले होतं. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांचा संभाजीराजेंना फोन, उद्या मुंबईत महत्वाची बैठक
पुण्यातील सारथी संस्थेवरून वाद पेटला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संभाजीराजेंना फोन केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - राजगृह निवासस्थान तोडफोड प्रकरण, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेविरोधात जनतेकडून, राजकीय नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राजगृहावर तोडफोड करणाऱ्या माथेफिरूंनी घटनास्थळावरून पळ काढल्याने सध्या पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोणाच्याही बाजूने, कधी विरोधात काहीही लिहितात, सामनाला स्वत:चा बेस नाही - फडणवीस
‘सामना’इतका अंतर्विरोध कुठेच पाहिला नाही. ‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवार साहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने. त्यांना स्वतःचा बेसच नाही, अशी बोचरी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजगृह तोडफोड प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा, फडणवीसांची मागणी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेविरोधात जनतेकडून, राजकीय नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राजगृहावर तोडफोड करणाऱ्या माथेफिरूंनी घटनास्थळावरून पळ काढल्याने सध्या पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाराजी नव्हे तर या निमित्ताने पवार मातोश्रीवर गेले होते
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. त्या भेटीविषयी तर्कवितर्क लावले जात होते. या बहुचर्चित भेटीवर शरद पवार यांनी आज खुलासा केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिल्यानंतर त्या स्थळापासून मातोश्री जवळच होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आपण गेलो होतो असा खुलासा त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
खळबळ वगैरे काही नाही ही फक्त त्यांची वळवळ - निलेश राणे
शरद पवारांना यावं मातोश्रीवर लागलं अशी परिस्थिती नाही,अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना,तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांना मातोश्रीवर यावं लागलं अशी परिस्थिती नाही - संजय राऊत
शरद पवारांना मातोश्रीवर यावं लागलं अशी परिस्थिती नाही, अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना, तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणाऱ्यांवर आज नगरसेवकांसाठी भीक मागण्याची वेळ
दोन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी -
शाळांकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सध्या कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. दरम्यान, शाळांकडून फी संदर्भात पालकांवर प्रचंड दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून देखील यावर कोणताही नियंत्रण किंवा हस्तक्षेप नसल्याचंच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार दरबारी विषय पोहोचविण्यासाठी पालकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन विषय सविस्तर त्यांच्यासमोर मांडला होता. सदर विषयाला अनुसरून अमित ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यावर गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
टाटा समूहाकडून मुंबई पालिकेला १० कोटी, १०० व्हेंटिलेटर्स आणि २० अँब्युलन्सची मदत
उद्योगपती रतन टाटा नेहमीच समाजोपयोगी कामात पुढे असतात. पुन्हा एकदा Covid संकटात महाराष्ट्राच्या मदतीला ते धावून आले आहेत. राज्याच्या प्लाझ्मा प्रकल्पासाठी मदत म्हणून 10 कोटी रुपयांचं साहाय्य टाटा उद्योगसमूहाकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेला सुपूर्द केलं. याशिवाय 100 व्हेंटिलेटर्स आणि 20 अँब्युलन्सही टाटा समूहाकडून देण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पवारांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपल्यानंतर अजित पवार मातोश्रीवर दाखल
राज्यात २ जुलैला झालेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज चर्चा झाली. या चर्चेत गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते. मात्र या बैठकीत नक्की काय निर्णय झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आज मातोश्रीवर जवळपास ४५ मिनिटे यावर चर्चा झाली.
5 वर्षांपूर्वी -
राहण्याची सुविधा पुरवणारे हॉटेल्स ८ जुलैपासून होणार सुरू
लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल्सला अखेर परवानगी मिळाली असून कन्टेमेंट झोनबाहेर असलेली हॉटेल्स ८ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबत आज निर्णय घेतला. हॉटेल्सच्या क्षमतेच्या ३३ टक्केच ग्राहकांना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची मुंबई पोलिसांकडून चौकशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी कलाविश्वातील अनेक दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच सध्या पोलीस यंत्रणा या प्रकरणी कसून चौकशी करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
गृहमंत्र्यांनी केलेल्या १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून रद्द
काल चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
कार्यपद्धती निश्चित झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार
राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरु आहे, ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही मिशन बिगिन अगेन अंतर्गत इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL