महत्वाच्या बातम्या
-
कोकणात मी एकटाच भाजपचा आमदार असूनही ट्रेन सोडू शकतो | तर कोकणी जनतेने विचार करावा - नितेश राणे
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी एकटाच आमदार आहे. बाकी सेनेचे आहेत. एक भाजपचा आमदार करू शकतो ते शिवसेनेच्या आमदाराला जमलं नाही याचा मला अभिमान आहे. पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत कोकणातील जनतेने विचार करावा. भाजपला मतदान दिल्यावर एक आमदार ट्रेन सोडू शकतो तर बाकीचे आमदार भाजपचे आमदार असते तर किती ट्रेन सुटल्या असत्या त्याचा कोकणवासियांनी विचार करावा, असं आवाहन राणे यांनी केलं.
4 वर्षांपूर्वी -
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. मात्र काही वेळातच ईडी कार्यालयात कागदपत्र देऊन गोरे आणि निंबाळकर हे बाहेर पडले आहे. बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. नेमकं कोणत्या कारणासाठी ते ईडी कार्यालयात आले होते, याची अद्यापही माहिती मिळू शकली नाही.
4 वर्षांपूर्वी -
अनिल परबांच्या अडचणींमध्ये वाढ | निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ईडीची नोटीस
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीकडून चौकशांचे सत्र सुरू आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर अनिल परबांच्या मागे देखील ईडीची पिडा लागली आहे. दरम्यान अनिल परब यांचे निगटवर्तीय मानले जाणार बजरंग खरमाटे यांच्या देखील ईडीकडून नोटीस बजावण्यता आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फोन टॅपिंग प्रकरण | रश्मी शुक्ला आरोपी नाहीत - राज्य सरकार
फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस बदल्यांशी निगडीत दस्ताऐवज लिक करण्याच्या प्रकरणात सीनियर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आरोपी नाहीत. त्यामुळे त्या एफआयआर रद्द करण्याची याचिका करू शकत नाहीत’, असा युक्तिवाद राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
वाघ आडनावाने कोणी वाघ होत नाही | डायलॅाग बाजी सोडा, नवऱ्यावर कार्यवाही झाली तेव्हा कुणाच सरकार होत ते सांगा
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा | नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांना पत्रं लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल | मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण
राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टी यांना उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राजू शेट्टी नृसिं यांना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावाचं पत्र दिले आहे. दरम्यान, या वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करने गरजेची असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | येत्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत राज्यात अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
लसीकरणात मुंबई अव्वल | 1 कोटींहून अधिक लोकांचं लसीकरण करणारा मुंबई देशातील पहिला जिल्हा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रयत्नांनंतर, मुंबई देशातील पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे एक कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. CoWIN पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारपर्यंत येथे 1 कोटी 63 हजार 497 लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. यापैकी 72 लाख 75 हजार 134 असे लोक आहेत ज्यांना पहिला डोस मिळाला आहे आणि 27 लाख 88 हजार 363 असे लोक आहेत ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वाझेला पुन्हा नाव कमवायचं होतं | म्हणून त्याच अट्टाहासातून अँटीलिया कट रचला | आरोप पत्र दाखल
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवस्थान असलेल्या ‘अँटीलिया’समोर स्फोटके भरलेली स्कार्पिओ गाडी आढळली होती. या प्रकरणी सीबीआयच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी न्यायालयात १० हजार पानांचं आरोप पत्र दाखल करण्यात आलं. या आरोप पत्रात प्रामुख्याने या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उत्तम तपास अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट असल्याचं सिध्द करण्यासाठी अँटीलियासमोर स्फोटकांनी भरलेली स्कर्पिओ गाडी ठेवल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पडळकर अज्ञानी बालक | ते आता-आता उगवलेलं गवत आहे - विजय वडेट्टीवार
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. त्यात हरवलेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. त्यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घणाघाती टीका केली आहे. पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता उगवलेलं गवत आहे. त्यांना काय माहीत आहे?, अशी जहरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांसाठी अलर्ट | मुंबईत डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाचं संकट कमी होतं ना होतं तोच आता मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ आली आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला | गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदनेतून सामाजिक संदेश
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खास गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस यांनी हे गाणे गायले आहे . गाण्याचे नाव गणेश वंदना, असे आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूहकाडे असेल.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | 2017 मध्ये हायकोर्टानं मागासवर्ग आयोग बसवा म्हटलं होतं | आज चोराच्या उलट्या बोंबा
ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या आजच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. मात्र, मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे आदेश देण्याचं ठरल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर ओबीसींचा डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात गेलो असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसी आरक्षणावर बैठक | ...तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये यावर सर्वांच एकमत
ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या आजच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. मात्र, मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे आदेश देण्याचं ठरल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर ओबीसींचा डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात गेलो असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
सोमैयांच्या मागणीप्रमाणे राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय झालं? | आ. वैभव नाईक यांचा सवाल
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना गुंतवण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलिंग करत आहेत. यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावरील ईडी चौकशीचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED Notice To Anil Parab | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. येत्या मंगळवारी परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझं देखील वृत्तपत्र आहे | लवकरच चॅनल देखील येईल | नारायण राणेंचा सेनेला थेट इशारा
नारायण राणेंना भाजपाकडून केंद्रीयमंत्री पद दिल्या गेल्याने, यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालेली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर या वादात अधिकच भर पडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक मोठा खुलासा केल्याचं दिसून आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं - हसन मुश्रीफ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केलाय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH