14 December 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

हनुमानासारखं पर्वत आणायला जाऊ नका; अजित पवारांचं आवाहन

Corona Crisis, Covid19, Ajit Pawar

मुंबई, ७ एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाच्या वाटेतील मोठा अडथळा झाल्यामुळे आता मंत्रीमंडाळील प्रत्येक व्यक्ती आपल्या परिने नागरिकांना त्यांच्या घरातच थांबण्याचं आवाहन करत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने जनतेला दिलासा आणि धीर देत आहेत. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा त्यांचं कर्तव्य बजावत वेळोवेळी नागरिकांना घरातच राहण्याचा इशारा देत आहे.

उद्या हनुमान जयंती आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी वनस्पतीसाठी पर्वत उचलून आणला होता. आज जनतेला वाचवण्यासाठी हनुमानासारखं पर्वत उचलण्याची गरज नाही. त्यामुळे उद्या घरीच थांबा आणि हनुमान जयंती साजरी करा, असं आवाहन करतानाच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

“करोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: The growing outbreak of the Corona virus is a major hurdle in the administration’s way, and now everyone in the cabinet is urging their fellow citizens to stay at their homes. With the increasing number of coronary patients in Maharashtra, Chief Minister Uddhav Thackeray is giving comfort and encouragement to the people. Similarly, Deputy Chief Minister Ajit Pawar is also warning citizens to stay at home from time to time while doing their duty.

 

News English Title: Story corona virus deputy Chief Minister Ajit Pawar appeal people to stay home Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x