6 May 2024 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

कोरोना आपत्ती: राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा ६३ वर पोहोचला: आरोग्यमंत्री

Health Miniter Rajesh Tope, Corona Crisis

मुंबई, २१ मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता ६३ वर पोहोचली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात आज २१ मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही ६३ वर पोहोचली आहे. शुक्रवारीही संख्या ५२ वर होती. त्यामुळे गेल्या २४ तासांत ११ नवीन रुग्ण आढळून आल्याची बाबसमोर आली आहे.

शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी ती ६३ वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात करोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना संसर्गामुळे करोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. ११ जणांपैकी १० जण हे मुंबईचे आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आले आहेत. तर ३ जणांना करोनाची बाधा संसर्गातून झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनाही राज्यातील परिस्थितीचा आढावा देण्यात आल्याचं ते म्हणाले.

 

News English Summery: The Corona virus has caused a worldwide outcry. In India too, the outbreak of Corona has been increasing day by day. The highest number of patients is found in Maharashtra. There has been a huge increase in the number of corona vi-dated patients in Maharashtra. The number of infected patients has now reached 63. According to a PTI news release, the total number of patients has reached 63 on March 21 in Maharashtra. Friday was also at 52. Therefore, in the last 24 hours, 11 new patients have been reported.

 

News English Title: Story Corona Virus health minister Rajesh Tope numbers increased News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x