मुंबईतील दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; इस्पितळात दाखल
मुंबई, १६ एप्रिल: कोरोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १९०० पेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली. त्यामुळे राज्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची तीन हजार ८१ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मात्र, आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी रुग्णांची वाढ कमी झाल्यानं सर्वांनाच थोडासा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत २९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
165 more #COVID19 cases (including 107 in Mumbai) reported in Maharashtra today, taking the total number of coronavirus cases in the state to 3081: State Health Department pic.twitter.com/a1xpyzfyrX
— ANI (@ANI) April 16, 2020
मुंबईमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचमध्ये तैनात असलेल्या ३४ वर्षीय सहाय्यक पोलिस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर भायखळा पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी पॉझिटव्ह आल्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याचसोबत भायखळ्याच्या पोलिस वसाहतीमध्ये कोरोनाबाधित पोलिस अधिकारी ज्या इमारतीमध्ये राहतात ती सील करण्यात आली आहे. वसाहतीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी केली जात आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
News English Summary: There is a picture that the situation is still under control while Corona is trying to stop the spread. The number of coroners in Maharashtra has reached 2916. At least nine people were killed in Maharashtra on Wednesday. So far 232 patients have been found to be Corona-positive. More than 1900 of these patients are from Mumbai and the rest are from Maharashtra. 187 people have died in Maharashtra.
News English Title: Story Corona virus Mumbai two police officers test positive for Covid 19 Corona crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News