सायन रुग्णालयात नवे प्रभारी, नवे पालिका आयुक्त, मग महापौरांचं काय? - आ. नितेश राणे
मुंबई, ९ मे: राज्य शासनाचे आदेश निघाल्यानंतर जराही वेळ न घालवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून इकबाल सिंह चहल यांनी रात्रीच मुंबई पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील करोनाचं संकट लक्षात घेऊन चहल यांनी सूत्रे स्वीकारताच रात्री उशिरा चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन करोना साथीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्याचे कळते.
दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीची सक्ती करणारे परिपत्रक काढून एक आठवडा उलटत नाही तोच पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची उपस्थिती ७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय घेतल्यानंतर काही तासातच पालिका आयुक्तांची बदली झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
दरम्यान, सायन रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पालिकेकडून सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे सध्या सायनमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रमेश भारमल हे आता २४ तास रुग्णालयातच राहणार असल्याचे समजते.
यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला लक्ष केलं आहे. या अनुषंगाने त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘सायन रुग्णालयात नवे प्रभारी अधिष्ठाता नियुक्त करण्यात आले आहेत. नव्या पालिका आयुक्तांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. मग मुंबईच्या महापौरांचं काय ज्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतात जेव्हा ह्या चुका होतं होत्या? केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना जवाबदार धरून राजकीय नेत्यांचं वाचवलं जातं…कायदा हा सर्वांना समान असला पाहिजे….अशी संतप्त भावना आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
New Dean appointed in Sion hospital!
New Muncipal Com appointed!
N what abt the Mumbai Mayor who was leading us during all these mistakes?
Why only the bureaucracy blamed n political class protected..
The Law shud be the same 4 every1 or v will hv a demotivated bureaucracy!— nitesh rane (@NiteshNRane) May 9, 2020
News English Summary: BJP MLA Nitesh Rane has paid attention to the state government. He tweeted, “New in-charge superintendent has been appointed at Sion Hospital. New Municipal Commissioners have also been appointed. So what about the mayors of Mumbai who represent everyone when these mistakes were made?
News English Title: Story Mumbai BMC shunted Sion hospital dean Pramod Ingle and BMC New commissioner MLA Nitesh Rane News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा