15 December 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

ETF Fund | गुंतवणुकीसाठी योग्य ईटीएफ निवडताना ह्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे, गुंतवणूकीपूर्वी ही विशेष काळजी

ETF Fund

ETF Fund | स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जशी आपण विशेष काळजी घेतो, तपासणी करतो, स्टॉक बद्दल संशोधन करतो, त्याचप्रमाणे ईटीएफमध्ये देखील गुंतवणूक करण्यापूर्वी काही बाबी तपासणे गरजेचे आहे. सध्या गुंतवणूकदारांसमोर गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एक जबरदस्त पर्याय म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला आपण ईटीएफ म्हणूनही ओळखतो. हे ETF फंड अनेक शेअर्सच्या संचामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवतात.

यामध्ये पारंपारिक स्टॉक, बाँड, चलनी नोटा, आणि कमोडिटीज सारख्या आधुनिक सिक्युरिटी हे सर्वकाही समाविष्ट आहेत. कोणताही गुंतवणूकदार एखाद्या चांगल्या ब्रोकरद्वारे ईटीएफचे शेअर्स खरेदी विक्री करू शकतो. या ETF चा व्यवहार देखील स्टॉक प्रमाणे शेअर बाजारात केला जातो.

ईटीएफ च्या खर्चाचे प्रमाण 0.06 टक्के इतके कमी असते. इतर सक्रिय गंतवणुक फंडपेक्षा चांगली कर कार्यक्षमता, विविधीकरण फायदे आणि इंडेक्स लिंक्ड रिटर्न यामुळे ETF झपाट्याने लोकांचा विश्वास जिंकत आहेत. तज्ञांच्या मते, स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जशी आपण कंपनीच्या कामगिरीचा अभ्यास करतो, माहिती गोळा करतो, त्याचप्रमाणे ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वीही काही गोष्टी पडताळणे आवश्यक आहे.

ETF मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी खालील बाबीची तपासणी करा.
* ETF मध्ये फक्त इक्विटी फंड ऐवजी इतर पर्यायांचा देखील समावेश असावा.
* ETF निवडताना किंवा गुंतवणूक करताना, तुम्ही L4U धोरणावर अवलंबून राहावे : लिक्वीडीटी ( तरलता) , कमी खर्चाचे प्रमाण, कमी परिणाम खर्च, कमी ट्रॅकिंग त्रुटी आणि इंट्रा डे सिक्युरिटीज.
* ईटीएफच्या तरलतेमुळे गुंतवणूकदारांना स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी विक्री व्यवहार करणे सोपे जाते.
* तरलतेचा अर्थ असा आहे की ETF चे एक्सचेंजेसवर ट्रेडिंग व्हॉल्यूम असणे खूप आवश्यक आहे.
* साधारणपणे, ETF च्या खर्चाचे गुणोत्तर सक्रिय फंडांच्या तुलनेत बरेच कमी असते, परंतु गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या ETF च्या खर्चाच्या गुणोत्तरांची एकमेकांसोबत तुलना केली पाहिजे कारण त्याचा परिणाम तुमच्या परताव्यावर होईल.
* इम्पॅक्ट कॉस्ट म्हणजे एक्सचेंजवरील व्यवहाराची अप्रत्यक्ष किंमत. फंडची तरलता जितकी जास्त असेल तितका परिणाम खर्च कमी असेल आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना तितकं कमी अप्रत्यक्ष कर भरावा लागेल.
* कोणताही ईटीएफ निवडताना ट्रॅकिंग त्रुटी कमी असावी, हा एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे निर्देशांकाच्या तुलनेत तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यातील फरक कमी होण्यास मदत होते.
* साधारणपणे, 0 ते 2 टक्के ट्रॅकिंग एरर इंट्रा डे सिक्युरिटीजसाठी आदर्श मानली जाते.
* ETF निवडताना सर्वात महत्त्वाचे पॅरामीटर म्हणजे इंट्रा डे सिक्युरिटीज आहे कारण तुम्हाला मिळणारा परतावा त्याच्या दिवसभराच्या कामगिरीवर अवलंबून असतो.

भारतात ईटीएफची वाढती लोकप्रियता :
मागील काही काळात ETF गुंतवणुकीच्या बाबतीत लोकामध्ये आवड झपाट्याने वाढत आहे. जगभरात ETF मधील गुंतवणुकीतील कल वाढत चालला आहे. मागील दहा वर्षांमध्ये जगभरातील ETF AUM 19 टक्क्यांच्या वार्षिक चक्रवाढ दराने वाढला आहे. यावरून अंदाज लावता येतो की 2020 मध्ये, ETF ने 7.7 बिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल 562 लाख कोटी ची पातळी ओलांडली आहे. भारतात ETF AUM मध्ये मागील पाच वर्षांत 65 टक्के वाढ झाली आहे. आणि भारतातील एकूण AUM (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) मध्ये ETF चा वाटा आर्थिक वर्ष 2016 मध्ये 2 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2021 मध्ये 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ETF मधील 90 टक्के गुंतवणूक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, प्रामुख्याने EPFO कडून केली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ETF Fund Precautions before investing in ETF Fund on 13 August 2022.

हॅशटॅग्स

ETF Fund(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x