27 April 2024 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार?
x

Multibagger Mutual Funds | करोडपती होणे झाले सोपे! 10 वर्षांत 1 कोटी रुपये मिळतील, तज्ज्ञांनी सुचवल्या 'या' म्युच्युअल फंड योजना

Multibagger Mutual Funds

Multibagger Mutual Funds | दीर्घकालीन गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांकडे पाहिले जाते. यामध्ये गुंतवणूकदार दर महा ठराविक रक्कम जमा करतात आणि जे सर्व पैसे फंड मॅनेजरमार्फत स्टॉक, बाँड आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. म्युच्युअल फंड योजना सामान्यतः गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो, कारण त्यात खूप कमी फी, उत्कृष्ट तरलता, एकाधिक सिक्युरिटीजद्वारे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा पर्याय आणि कर्ज, सोने इत्यादी फायदे गुंतवणुकदारांना मिळत असतात. म्युचुअल फंड योजनांमध्ये तुम्ही दरमहा किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. पण यामध्ये केलेली अधिक गुंतवणूक तुम्हाला 10 वर्षात करोडपती देखील बनू शकते.

म्युचुअल फंड गुंतवणूक कशी करावी?
म्युचुअल फंड तज्ञ म्हणतात की, 10 वर्षांत 1 कोटी रुपये परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना दरमहा किमान 43,500 रुपये एसआयपीमध्ये जमा करावे लागेल. किंवा गुंतवणुकदार दरमहा 32,000 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करू शकतो, आणि मात्र त्यांना दर वार्षिक आधारावर 10 टक्के गुंतवणूक रक्कम वाढवावी लागेल. या दोन पद्धतींनी तुम्ही अवघ्या 10 वर्षांत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून करोडपती होऊ शकता. या हिशोब आपण फक्त 12 टक्के वार्षिक या अपेक्षित परताव्याच्या आधारावर केला आहे. करोडपती होण्याचा आणखी एक मार्ग आहे, तो म्हणजे तुम्ही एकरकमी 32.20 लाख 10 वर्षासाठी गुंतवले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. येथे देखील वार्षिक 12 टक्के अपेक्षित परताव्याच्या आधारे गणना केली आहे.

गुंतवणुकीसाठी तज्ञांनी सुचवलेले 4 फंड :
तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 4 म्युचुअल फंड सुचवले आहेत, ज्यामध्ये तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करू शकता. एकूण SIP रकमेच्या 30 टक्के रक्कम ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड ग्रोथ लार्ज कॅप श्रेणीमध्ये जमा करा. त्याचप्रमाणे, तुम्हाला SBI लार्ज आणि मिडकॅप फंड ग्रोथ या लार्ज आणि मिड कॅटेगरीमध्ये 15 टक्के गुंतवणूक करावी लागेल. तर मिरे अॅसेट मिडकॅप फंड रेग्युलर ग्रोथ या मिड कॅप स्कीममध्ये किंवा कोटक स्मॉल कॅप फंड रेग्युलर ग्रोथ या स्मॉल कॅप स्कीममध्ये पैसे लावा. आणि उर्वरित 30 टक्के रक्कम एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड ग्रोथ या मिड कॅप स्कीममध्ये गुंतवणूक करा.

परताव्याचे संपूर्ण गणित :
10 वर्षांत 1 कोटी रुपये जमा करण्यासाठी, तुम्हाला म्युच्युअल फंडांमध्ये SIP द्वारे दरमहा 40-45 हजार रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वार्षिक 11 टक्के ते 13 टक्के CAGR परतावा मिळू शकतो. पण लक्षात ठेवा की म्युचुअल फंड योजना बाजाराच्या अधीन आहे, त्यामुळे यात मिळणारे परतावे निश्चित नाहीत. यामध्ये कमतरता किंवा अतिरेक ही पाहायला मिळू शकतो. याचा अर्थ तुमचा परतावा कमी जास्त होऊ शकतो.

कुठे गुंतवणूक करावी?
गुंतवणूक बाजारात 10 वर्षे हा खूप मोठा कालावधी मानला जातो. त्यामुळे तुम्ही स्मॉल किंवा मिड कॅप-ओरिएंटेड म्युचुअल फंडांमध्ये पैसे लावू शकता. पण लार्जकॅप म्युचुअल फंड हा एक चांगला आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय असू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Mutual Funds scheme for investment check details on 03 March 2023.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Funds(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x