14 December 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Mutual Fund SIP | पैसा कमविण्याचा मोठा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड | फक्त 100 रुपये महिना सुरुवात करा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही एक वित्तीय पॉलिसी आहे ज्यामध्ये हप्त्याची ठराविक रक्कम नियमितपणे एखाद्या योजनेत गुंतवली जाते. ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूकदार ठराविक रक्कम नियमित कालांतराने गुंतवतो. यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविण्याऐवजी म्युच्युअल फंडांमध्ये कमी कालावधीची गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य मिळते.

गुंतवणूकीची पद्धत खूप सोपी होते :
एसआयपीमुळे गुंतवणूकीची पद्धत खूप सोपी होते. यामध्ये सामान्य माणूसही भारदस्त बजेटऐवजी कमी बजेट असलेल्या म्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणूक करू शकतो. या माध्यमातून गुंतवणूकदारांनाही वाढत्या वर्षांत चांगला परतावा मिळतो.

एसआयपीचे फायदे :
गुंतवणूक करण्याचा हा एक अतिशय सोपा मार्ग आहे. ही अशी योजना आहे ज्याअंतर्गत आपण केवळ आपल्या भांडवलाचे जतन तसेच आवश्यक रक्कम मिळवू शकत नाही.एसआयपी दीर्घकालीन योजनांमध्ये प्रभावी आहे.ज्या गुंतवणूकदाराला बाजारात जास्त जोखीम घ्यायची नाही आणि ज्याच्याकडे जास्त पैसे नाहीत तो एसआयपीकडे वळू शकतो.

दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक :
म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे हा एक परिपूर्ण पर्याय असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात नियमित गुंतवणूक केल्यास चांगला फंड तयार होण्यास मदत होऊ शकते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपण कोणत्या उद्देशाने गुंतवणूक करीत आहोत, याचेही लक्ष्य निश्चित करायला हवे. त्यामुळे केवळ गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूक न करता उद्देशही त्याच्याशी जोडला गेला पाहिजे. आपण सेवानिवृत्ती, घर किंवा इतर कोणत्याही आर्थिक हेतूचा समावेश करू शकता.

टार्गेट’नुसार गुंतवणूक :
२० वर्षांपर्यंत दरमहा १० हजार रुपये गुंतवल्यास त्याला वार्षिक १२ टक्के दराने सुमारे ९१ लाख रुपयांचा फंड तयार करता येईल. जर गुंतवणुकीची रक्कम १०,० रुपयांवरून १५,००० रुपये प्रति महिना केली तर २० वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे १.३६ कोटी रुपये असतील.

तुम्ही 100 रुपये देखील गुंतवू शकता :
म्युच्युअल फंडाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण केवळ १०० रुपयांच्या छोट्या रकमेसह देखील गुंतवणूक सुरू करू शकता. मासिक एसआयपीमध्ये १०० रुपयांची गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास त्याचा कोम्बिंग व्याजाचा चांगला फायदा होतो.

कशी करावी गुंतवणूक :
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. पहिल्यांदा गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमचं केवायसी पूर्ण करावं लागतं. केवायसी व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही वितरक किंवा कन्सल्टंटकडे जाऊ शकता किंवा ऑनलाइन ई-केवायसी करू शकता. केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही फंडात गुंतवणूक करू शकता.

गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडू शकता :
केवायसी पडताळणीनंतर तुम्ही म्युच्युअल फंड वितरक, नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार, शेअर बाजाराचा दलाल किंवा बँकेच्या मदतीने गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडू शकता. पण स्वत:ला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही फंड हाऊसच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mutual Fund SIP investment with Rs 100 check scheme details 17 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x