13 December 2024 11:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, टाटा म्युच्युअल फंडाची धमाकेदार योजना लाँच, NFO चे तपशील तपासा

Tata Mutual Fund

Tata Mutual Fund | टाटा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने आपल्या गुंतवणुकदार ग्राहकांसाठी ‘टाटा मल्टीकॅप फंड’ लाँच केला आहे. ‘टाटा मल्टीकॅप फंड’ लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये भांडवल गुंतवणारी ‘ओपन-एंडेड इक्विटी म्युचुअल फंड योजना’ असेल. हा मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूक करण्यासाठी 16 जानेवारी 2023 रोजी खुला करण्यात येईल. या NFO मध्ये गुंतवणूक करण्याचा अंतिम दिवस 30 जानेवारी 2023 रोजी असेल. त्यानंतर ही योजना विक्री आणि पुनर्खरेदीनंतर वाटपासाठी ठेवली जाईल. एनएफओ मध्ये ही पैसे लावून मजबूत परतावा कमावता येतो. त्यासाठी या योजनेचे पूर्ण तपशील जाणून घ्या.

नवीन योजनांची लॉन्चिंग :
‘टाटा मल्टीकॅप फंड’ बेंचमार्क ‘निफ्टी 500 मल्टीकॅप निर्देशांक’ फॉलो करेल. आणि त्याचा एकूण परतावा निर्देशांक 50:25:25 असेल. म्हणजेच ही योजना 50 टक्के भांडवल लार्ज कॅप स्टॉकमध्ये, 25-25 टक्के भांडवल अनुक्रमे मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये लावेल. टाटा AMC ही योजना नियमित आणि थेट अशा दोन प्रकारात लाँच करणार आहे. CIO-इक्विटी आणि टाटा अॅसेट मॅनेजमेंट या दोन संस्था टाटा मल्टीकॅप फंड योजनांवर लक्ष केंद्रित करेल. विविध मार्केट कॅप्स, रणनीती, थीम आणि क्षेत्रे यामध्ये पैसे लावून आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून देणे आणि त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी जोखीम-समायोजित परतावा देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असेल.

3-5 वर्ष गुंतवणुकीसाठी उत्तम योजना :
टाटा मल्टीकॅप म्युचुअल फंड योजना पुढील 3-5 वर्षांत भारतासाठी व्यापक-आधारित आर्थिक विकासाच्या संभाव्यतेचा फायदा घेण्यासाठी एक जबरदस्त फंड ठरू शकतो. या योजनेत गुंतवणूक करून लोक विविध आकाराच्या कंपनीच्या शेअर मध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करून आपली जोखीम कमी करु शकतात.

योजनेचा पोर्टफोलिओ :
टाटा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या मते, मल्टीकॅप म्युचुअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये विविध आकाराच्या मार्केट कॅप आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या सिक्युरिटीजचा समावेश असेल. या योजनेच्या माध्यमातून स्थिरता आणि संधी यांच्यातील योग्य संतुलन प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या कंपन्या कमाईच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत त्यात गुंतवणूक करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कमाईच्या चक्रातील तीन विभाग म्हणजे कमाईची स्थिरता, कमाईचे अपग्रेड आणि कमाईचे टर्नअराउंड हे घटक विचारात घेतले जातील.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट आणि व्यवस्थापक :
इक्विटी मार्केट आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये दीर्घकालीन भांडवल वाढ करणे हे या योजनेचे गुंतवणुकीचे मुख्य उद्दिष्ट असेल. तथापि, योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईल याची गॅरंटी नाही. दुसरे म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला हमखास परतावा मिळेल याची देखील गॅरंटी नाही. या म्युचुअल फंड योजनेच्या निधी व्यवस्थापक पदी राहुल सिंग या इक्विटीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मूर्ती नागराजन यांना कर्ज विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे..आणि अरविंदकुमार चेट्टी परकीय गुंतवणूक फंडची माहिती देण्यात आली आहे. तर तेजस गुटका हे इक्विटी विभागाचे सह-निधी व्यवस्थापक पदाची जबाबदारी पडणार आहेत.

किमान गुंतवणूक रक्कम :
टाटा मल्टीकॅप म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 5,000 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्ही 1 रुपयेच्या पटीत कितीही रक्कम गुंतवणूक करू शकता.

NFO बद्दल सविस्तर :
जेव्हा एखाद्या कंपनीला व्यापार वाढीसाठी अतिरीक्त भांडवल हवे असते किंवा कंपनीतील गुंतवणूकदारांना खुल्या बाजारात शेअर विकून फायदा हवा असतो तेव्हा ती कंपनी आपला IPO स्टॉक एक्स्चेंजमध्ये गुंतवणुकीसाठी खुला करते. अशाप्रकारे, जेव्हा एखादा म्युच्युअल फंड हाऊस नवीन म्युचुअल फंड योजना लाँच करतो, तेव्हा ती नवीन योजना गुंतवणूकदारांसाठी खुली केली जाते, त्याला NFO म्हणजेच ‘न्यू फंड ऑफर’ असे म्हणतात. गुंतवणुकदार सुरुवातील एनएफओ मध्ये गुंतवणूक करतात आणि त्यानंतर ती योजना सामान्य पद्धतीने गुंतवणुकीसाठी उपलब्ध होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Mutual Fund scheme return investment on 16 January 2023.

हॅशटॅग्स

#Tata Mutual Fund(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x