20 June 2021 10:15 PM
अँप डाउनलोड

तरुण भारत माहिती नाही? स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल: तरुण भारत

Tarun Bharat Newspaper, Shivsena MP Sanjay Raut, Saamana Newspaper

नागपूर : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना संजय राऊत यांच्यावर तरुण भारत या दैनिकाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एका अग्रलेखावरून एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असे आम्हाला कधीही वाटले नव्हते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आज महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रूपाने प्रश्न विचारतेय्‌ आणि त्याची उत्तरे देणं सोडून आपलं अज्ञान प्रगट करण्याचे काम कुणी करीत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे. तरुण भारत माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्‍या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल अशा शब्दात तरुण भारत या दैनिकाने संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये रंगणारी खडाजंगी कमी होती की काय, म्हणून आता शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ आणि रा. स्व. संघाचे मुखपत्र ‘तरुण भारत’ यांच्यामध्येही कलगीतुरा रंगत आहे. ‘तरुण भारत’ माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’ आहेत, अशा शब्दात ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून राऊतांचा समाचार घेण्यात आला आहे.

एका अग्रलेखावरुन एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल, की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं, असा टोला संजय राऊत यांना लगावण्यात आला आहे. तरुण भारत माहिती नाही, असं सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणाऱ्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल, असा टोमणाही संजय राऊत यांना मारण्यात आला आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(221)#Shivsena(1097)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x