महत्वाच्या बातम्या
-
राम कदमांना आवरा! अफवांच्या आहारी जाऊन त्यांनी सोनाली बेंद्रेला ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली
मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना ‘एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन’, अशी मुक्ताफळे उधळणारे भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कॅन्सर झाल्याने उपचार घेण्यासाठी अमेरिकेत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेला अफवांच्या आहारी जाऊन ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. तसे त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्विट सुद्धा केलं. परंतु, ती अफवा असल्याचे ध्यानात येताच ते ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे राम कदम पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ व्हायरल: राम कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांवर फिल्मलाईन'मधील नृत्य कलाकार संघटनेतील तरुणींचा गंभीर आरोप
भाजपचे आमदार राम कदम यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह नाहीत. दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांच्याबाबत केलेल्या विवादित वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर फिल्मलाईन’मधील ‘सिने डान्सर्स असोसिएशन’ या नृत्य कलाकार मुलींनी भाजप आमदार राम कदम तसेच त्यांचे सहकारी गंगेश्वर यांच्यावर दुसरी समांतर युनियन बनवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
धुळे महापालिका: गिरीश महाजणांविरोधात आमदार अनिल गोटे आणि सामान्य कार्यकर्ते दंड थोपटणार?
भाजपने सध्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्राचे सर्वेसेवा करण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. परंतु जे जळगाव महानगर पालिका निवडणुकीत झालं ते ते संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होईल अशी भोळी अशा सध्या भाजप वरिष्ठांच्या मनात निर्माण झाली असावी. त्यामुळे आगामी धुळे महानगर पालिकेची जवाबदारी सुद्धा स्थानिक आमदार अनिल गोटे यांच्याकडून वर्ग करून ती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
महागाईमुळे गणपतीबाप्पाच्या आगमनाआधी सामान्य हैराण, २०१९ ला बाप्पा मूळ 'केंद्रीय' विघ्नच दूर करो? सामान्यांचा रोष
मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेला सुद्धा बसणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचा राम कदम म्हणजे 'हराम कदम', उद्धव ठाकरेंची सामना'तून बोचरी टीका
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना’मधून आज भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजप आमदार राम कदम यांच्यावर सडकून बोचरी टीका करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राम कदमांच्या विरोधात आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मैदानात
भाजपचे आमदार राम कदम यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आता खुद्द आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मैदानात उतरून घाटकोपरमध्येच आंदोलन करणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याचा निर्णय
तेलंगणामध्ये एक मोठी राजकीय घटना घडली असून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहम यांची भेट घेऊन विधानसभा बरखास्तीची अधिकृत घोषणा करतील.
7 वर्षांपूर्वी -
खुलेआम उत्सवात महिलांचा अपमान करणाऱ्या राम कदमांची केवळ ट्विटर'वरून 'डिजिटल माफी'
भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत भर दहीहंडी उत्सवात विवादित वक्तव्य केलं होत. मात्र राज्यभर तीव्र पडसाद उमटल्यावर माताभगिनींची ट्विटर वरून टिवटिव करत ‘डिजिटल माफी’ माफी मागून वेळ मारून घेतली आहे. त्यामुळे भविष्यात काही करा आणि ट्विट करून विषय मिटवा, असा ट्रेंड राजकारणात सुरु झाल्यास नवल वाटायला नको.
7 वर्षांपूर्वी -
स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदमांविरोधात महिला आयोगाकडून स्युमोटो दाखल
दहीहंडी दरम्यान महिलांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांच्याविरोधात स्युमोटो दाखल करून घेतल्यानंतर त्यांना ८ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आज सवर्णांकडून आरक्षणाच्या विरोधात भारत बंदची हाक
दलित समाजाच्या केवळ दोन पिढ्यांनाच नोकरी तसेच शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. परंतु त्यानंतर त्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत दलित आरक्षणाला विरोध करत देशभरातील सवर्ण समाजाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य प्रदेश, राजस्थान तसेच बिहार राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेनेच्या राज्यात पेट्रोल दर सेंचुरीच्या दिशेने रवाना, सामान्यांचा खिसा महागाईने जळणार
मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांनाच बसणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
मंगलदास बांदल राज ठाकरेंची कृष्णकुंज'वर भेट घेणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर आले असता त्यांची कार्यक्रमादरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल याच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळी पैलवान असून सुद्धा त्यांचे भाषण कौशल्य राज ठाकरेंना आवडले होते. त्यामुळे राज ठाकरेंना रमेश वांजळेंची आठवण तुम्ही करुन दिलीत. लोकसभेच्या उमेदवारीचं काय ते पुढं बघू. पण एकदा भेटा,` असं खुद्द राज ठाकरे यांनी हे निमंत्रण पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दौऱ्यादरम्यान दिले होते, असं त्यांनी पत्रकारांना कळवलं.
7 वर्षांपूर्वी -
ऑडिओ व्हायरल: राम कदमांना कॉल करून सुनावले, तुमचे आताचे गुरु एकदम घाणेरडे असल्याने विचार घाणेरडे झाले
भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका केली जात आहे. आमदार राम कदमांच्या विरोधात मनसेनेसुद्धा आघाडी उघडली असून, त्यांच्या विरोधात पोश्टरबाजी आणि त्यांना कॉल करून चांगलेच सुनावत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थान भाजपच विधानसभेआधी स्मार्टफोन देण्याचं गाजर
राजस्थानमध्ये लवकरच म्हणजे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक सर्व्हे मध्ये राजस्थानमध्ये भाजपच विद्यमान सरकार कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या राजस्थानमधील वातावरण भाजप विरोधी आणि काँग्रेससाठी अनुकूल असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची शिवसेनेकडून गंभीर दखल, सामाना'तून संकेत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची गंभीर दखल घेतल्याचे संकेत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत. त्यासाठी पक्षाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पक्षाच्या विश्वासातील सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर यांचा 'डिजिटल सर्वे' म्हणजे माझ्याच ग्राहकासाठी, माझ्याच संस्थेमार्फत, मीच मांडलेलं माझं मत?
कालच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्थेने एक ‘ऑनलाईन राजकीय सर्वे’ जाहीर केला. परंतु देशातील परिस्थितीचा सर्वांगीण बाजूने विचार केल्यास, त्या ऑनलाईन सर्वेमध्ये करण्यात आलेले दावे म्हणजे निव्वळ स्वतःच्या भावी ग्राहकासाठी केलेली साखर पेरणीच म्हणावी लागेल. वास्तविक भाजप हा त्यांचा सर्वात प्रमुख ग्राहक आहे. त्यामुळे सर्व्हेत दिसणाऱ्या भावना या सामान्यांच्या किती आणि I-PAC संस्थेच्या किती असा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुली पळविण्याचा कटात सामील आहे का भाजप सरकार? : राम कदमांविरोधात मनसेची पोश्टरबाजी
भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका केली जात आहे. आमदार राम कदमांच्या विरोधात मनसेनेसुद्धा आघाडी उघडली असून, त्यांच्या विरोधात पोश्टरबाजी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानी व राफेल कराराचा धसका? रायफल उत्पादनापासून केंद्राने अदानींना दूर ठेवलं
आधीच अनिल अंबानी आणि राफेल करारावरून मोदी सरकार अडचणीत आले असताना, त्याचा धसका घेऊन केंद्राने अदानी गृप सोबत रायफलची निर्मिती करु पाहणाऱ्या रशियाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. लढाऊ विमान बांधणीचा कोणताही पूर्व अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल विमानांच्या निर्मितीचं कंत्राट मिळाल्याने विरोधकांनी मोदी सरकारला अडचणीत आणले होते.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मुली पळवणं हे आमदाराच्या कार्यकक्षेत? आई-वडील म्हटले पसंत आहे तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार: राम कदम
काल झालेल्या दहीहंडी उत्सवात घाटकोपरमधील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपस्थितांना स्वतःचा मोबाईल क्रमांक देताना त्यांनी धक्कादायक विधान केलं, ज्यामुळे समाज माध्यमांवर त्यांच्या या धक्कादायक विधानाचा समाचार घेण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
कै. रमेश वांजळेनंतर आता प. महाराष्ट्रात मनसेकडून पैलवान मंगलदास बांदल शिरूर लोकसभेसाठी इच्छुक?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष विस्ताराच्या निमित्त राज्याच्या दौऱ्यावर होते. काल त्यांच्या हस्ते मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी उभारलेल्या भव्य ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचे लोकार्पण करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्य संचारल्याचे चित्र त्यांच्या राजकीय दौऱ्यातून पाहायला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH