15 December 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

Professor and Principal Recruitment 2021 | महाराष्ट्रात 2088 प्राध्यापक आणि 370 प्राचार्य पदांसाठी भरती

Professor and Principal Recruitment 2021

मुंबई, १६ नोव्हेंबर | उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सहायक प्राध्यापक पदाच्या 2088 तर 370 प्राचार्य पदांच्या भरतीसाठी मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारनं या शासन निर्णयाद्वारे प्राध्यापक आणि प्राचार्य पदाच्या भरतीवरील निर्बंध शिथील केले आहेत. 2088 सहायक प्राध्यापक पदासाठी शासन निर्णय जाहीर करत पुढील प्रक्रिया कशी असेल हे (Professor and Principal Recruitment 2021) स्पष्ट केलं आहे.

Professor and Principal Recruitment 2021. The Department of Higher and Technical Education has issued a government decision approving the recruitment of 2088 Assistant Professors and 370 Principals :

अतिरिक्त पदांचं समायोजन :
राज्य सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सहायक प्राध्यापक भरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी अतिरिक्त ठरलेल्या प्राध्यापकाचं समायोजन करण्याच्या सूचना राज्य सरकारच्यावतीनं देण्यात आल्या आहेत. संबंधित विषयासाठी सहायक प्राध्यापकाचे पद अतिरिक्त नसल्याचे विभागीय सहसंचालकांनी प्रमाणित केल्यानंतरच संबंधित संस्था आणि महाविद्यालयाला पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल.

नियुक्ती:
सहायक प्राध्यापक पदावर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सन 2022-23 या शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या दिनांकापासून करण्यात यावी. तसेच वेतन सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनांकापासून सुरू करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारनं सहायक भरतीस मान्यता दिलेल्या शिक्षकीय पदांची पदभरती करताना प्रत्येक महाविद्यालयास संबंधित विद्यापीठ / नियामक प्राधिकरणाने दिलेली संलग्नता (Affiliation) अबाधित राहण्यासाठी तसेच महाविद्यालयाचे मूल्यांकन व पुर्नमूल्यांकन होण्याकरिता आवश्यक असलेली मर्यादा विचारात घेऊनच शिक्षकीय पदांचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यानुसारच पदभरती करण्यात यावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Professor and Principal Recruitment 2021 for 2088 posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x