29 April 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Facebook Instagram | फेसबुक-इन्स्टावर द्वेषयुक्त भाषण आणि हिंसक कंटेंट वेगाने वाढतोय | मेटा रिपोर्ट

Facebook Instagram

Facebook Instagram | सोशल मीडिया साइट्सवर द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसक कंटेंट वाढत आहे. मेटाने (पूर्वीचे फेसबुक) प्रसिद्ध केलेल्या मासिक अहवालानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर द्वेषपूर्ण भाषण एप्रिलमध्ये ३७.८२ टक्क्यांनी वाढले आहे, तर फोटो शेअरिंग ऑनलाइन प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील हिंसक सामग्रीत ८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इतक्या सामग्रीवर केलेली कारवाई :
मेटाने ३१ मे रोजी हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, फेसबुकने एप्रिलमध्ये ५३,२०० हेट स्पीच ओळखले, जे मार्चमध्ये ३८,६०० द्वेषपूर्ण भाषणांच्या तुलनेत ३७.८२ टक्क्यांनी अधिक आहे. ही अशी सामग्री आहे ज्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कारवाई केली. इन्स्टाग्रामबद्दल बोलायचे झाले तर एप्रिलमध्ये या प्लॅटफॉर्मवर ७७,००० हिंसक कंटेंटची ओळख पटली होती, तर मार्चमध्ये ही संख्या ४१,३०० होती.

अशी केली जाते कारवाई :
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मानकांच्या विरोधात असलेल्या पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा कमेंट्सवर कारवाई केली जाते, असं मेटाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याविरोधात कारवाई करताना एकतर फेसबुक-इन्स्टाग्रामवरील कंटेंट काढून टाकला जातो किंवा काही युझर्ससाठी आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओजला वॉर्निंगचा आधार दिला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Facebook Instagram hate speech violent content rises 86 percent says Meta report 02 June 2022.

हॅशटॅग्स

#Facebook Instagram(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x