Unknown Caller | ट्रू कॉलर अॅप इतिहासजमा होण्याच्या दिशेने, सरकार KYC प्रमाणे कॉलरची माहिती दाखवणार
Unknown Caller | आज जगभरात अनेक जण ट्रू कॉलर अॅपचा वापर करतात. या अॅपमध्ये अनेक खास फिचर्स आहेत, ज्याच्या मदतीने कोणती व्यक्ती अज्ञात नंबरवरून युजरला कॉल करत आहे. अनेक वेळा लोक प्रश्न करतात की ट्रू कॉलर अॅप अज्ञात व्यक्तीचे नाव कसे शोधते? अनोळखी कॉलरचं नाव सांगण्यासोबतच हे अॅप तुम्हाला इतरही अनेक फिचर्स देतं. ट्रू कॉलर अॅपच्या मदतीने तुम्ही कॉलर आयडेंटिफिकेशन, कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल ब्लॉकिंगही करू शकता. याच कारणामुळे अनेकजण या अॅपचा वापर करतात. मात्र आता ट्रू कॉलर अॅप इतिहास जमा होण्याची शक्यता आहे.
कारण स्वतः भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) लवकरच अशा उपाययोजना सुरू करणार आहे, ज्यामुळे कॉल/रिंगिंग होत असताना रिसीव्हरच्या फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव चमकेल, असे एका अहवालात म्हटले आहे. कॉलरने सादर केलेल्या नो युवर कस्टमर (केवायसी) डेटाच्या आधारे हे नाव जोडले जाईल, असे पीटीआयच्या अहवालात म्हटले आहे.
या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.
KYC प्रमाणे खरी माहीती मिळणार
अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलमुळे अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता अनोळखी नंबरवरुन लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर काही प्रमाणाक आळा बसणार आहे. दरम्यान, सध्या देखील आपल्याला अनोळखी नंबर कोणाचा आहे हे पाहता येतं. त्यासाठी आपण Truecaller सारख्या अॅप्सचा वापर देखील करतो. मात्र Truecaller सारखी अॅप्स तुमच्या मोबाईलमधील डाटा विकण्याची शक्यता असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Unknown caller details will be displayed as per KYC provided says TRAI report check details on 16 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News