15 December 2024 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Important Documents | व्हॉट्सऍपचा मोठा फायदा, आता तुमचे महत्वाचे डॉक्यूमेंट व्हॉट्सऍपवर एका क्लिकवर डाउनलोड करून मिळतील

 Important Documents

 Important Documents | सोशल मीडिया आणि मॅसेंजींग सर्वीस मधील व्हॉट्सऍप हे सर्वात लोकप्रीय माध्य बनले आहे. या मार्फत कोणत्याही व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवरून बातचीत करता येते. तसेच विविध फोटो, फाईल, डॉक्यूमेंट तुम्ही एकमेकांना पाठवू शकता. अशात आता यात आणखील अपडेट सेवा पुरवली जात आहे. व्हॉट्सऍप मार्फत आता तुम्हाला तुमचे महत्वाचे डॉक्यूमेंट डाउनलोड करता येणार आहेत. यात तुमचे ड्रायवींग लायसन्स, मार्कशीट, पॅनकार्ड, आधार कार्ड अशा सर्व महत्वाच्या कगदपत्रांचा समावेश आहे. यासाठी तुम्हाला काही छोट्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुमच्या चॅट बॉक्समध्येच तुमचे सर्व महत्वाचे कागदपत्र तुम्हाला मिळतील.

यासाठी तुम्हाला आधी डिजिलॉकरची आवश्यकता आहे. यात तुमचे सर्व डॉक्यूमेंट तुम्हाला टाकावे लागतील. त्यात तुमचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. मोबाईल क्रमांक व्हॉट्सऍपवर देखील असावा आणि तो तुमच्या आधारला लिंक असावा. तसे असल्यास तुमचे सर्व दस्ताएवज वेरीफाय केले जातात. ही प्रक्यीया एकदाच करावी लागते. त्यानंतर लॉगइन करून पासवर्ड टाकावा लागतो आणि तुम्हाला तुमचे डॉक्यूमेंट व्हॉट्सऍपवर मिळतात.

अशी मिळवा व्हॉट्सऍपवर तुमची मार्कशीट
तुम्हाला तुमची मार्कशीट व्हॉट्सऍपवर डाउनलोड करण्यासाठी डिजिलॉकर ऍक्सेस व्हॉट्सऍपवर सेट करावे लागेल. तुमच्या व्हॉट्सऍपमध्ये MY GOV हा चॅट नंबर असावा. ९०१३१५१५१५ हा त्यांचा क्रमांक आहे. हा नंबर सेव केल्यावर त्यावर hi, hello, नमस्कार किंवा डिजिलॉकर असा मॅसेज पाठवा. त्यानंतर त्यावर तुम्हाला एक स्वागताचा मॅसेज येतो. पुढे तुमच्या डिजिलॉकरचे तपशील विचारले जातात. ते टाकल्यावर तुमचा आधारला लिंक असलेला नंबर टाकून ओटीपी मिळवा. ओटीपी टाकल्यावर तुमचा नंबर लिंक होतो. तसेच तुम्हाला तुमचे उत्तीर्ण प्रमाणपत्र दिसते. ते तुम्ही डाउनलोड करू शकता.

पॅन कार्ड
पॅनकार्ड मिळवण्यालाठी देखील तुम्हाला त्या क्रमांकावर हाय मॅसेज पाठवावा लागेल. MY GOV मध्ये प्रत्येक वेळी नविन विंडो दिसेल. त्यात विचारलेली माहिती निट भरल्यावर त्याचे वेरीफीकेशन होईल, त्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवले जाईल. अशा पध्दतीने तुम्ही पॅन कार्ड देखील डाउनलोड करू शकता.

ड्रायविंग लायसन
आज प्रत्येक सामान्य कुटूंबीयांकडे एक तरी वाहन आहे. त्यामुळे प्रवास करताना अनेकदा त्याची हार्ड कॉपी आपण विसरतो. त्यामुळे जवळ डिजिटल कॉपी असणे खुप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला MY GOV च्या क्रमांकावर मॅसेज करावा लागेल. तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन येतील. त्यातील लायसमनच्या पर्यायावर क्लीक केल्यानंतर तुमचा क्रमांक तपासला जातो. तो बरोबर असल्यावर तुम्हाला ड्रयविंग लायसन व्हॉट्सऍपमधून डाउनलोड करता येते.

वाहन नोंदनी प्रमाणपत्र
प्रवास करताना तुमच्याकडे व्हेइकल रजीस्टेशन सर्टीफीकेट म्हणजेच वाहन नोंदणी प्रमाणपत्र असणे फार महत्वाचे असते. त्यामुळे आरसी जवळ ठेवावी लागते. मात्र अशी हार्डकॉपी जवळ ठेवणे नेहमी कठीण असते. अनेकदा आपण ते विसरून जातो. त्यामुळे तुम्ही my gov मार्फत हे प्रमाणपत्र देखील डाउनलोड करु शकता आणि भराव्या लागणा-या दंडापासून स्वत:ला वाचवू शकता.

इनश्यूरन्स पॉलिसी
आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या विविध महागड्या वस्तूंसाठी इनश्यूरन्स पॉलिसी काढत असतो. यात देखील सेम प्रोसेस फॉलो करत तुम्ही तुमची पॉलिसी अदगी चुटकी सर्शी मिळवू शकता. अनेक व्यक्ती जास्त वर्षांसाठी पॉलिसी काढत असतात. अशात ही कागदपत्रे संभाळून ठेवावी लागतात. मात्र काही कारणास्तव जर ही कागदपत्रे तुम्चायकडून गहाळ झाली तर त्यावर चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही MY GOV मार्फत व्हॉट्सऍपवर तुमची पॉलिसी डाउनलोड करु शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Your important documents can be downloaded on WhatsApp 03 November 2022.

हॅशटॅग्स

Important Documents(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x