1 June 2024 8:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ग्रॅच्युईटी संदर्भात मोठी घोषणा, लाखोंचा फायदा होणार Double Line on Cheque | बँक चेकच्या डाव्या कोपऱ्यातील त्या 2 ओळी, पण अनेकांना त्याबद्दल 'ही' माहितीच नाही LIC Policy Surrender | पगारदारांसाठी गुड-न्यूज! LIC पॉलिसी सरेंडर करून 48 तासांत पैसे मिळणार, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 02 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Senior Citizen Saving Scheme | सरकारी बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD, मिळेल मजबूत व्याजदर आणि परतावा
x

देशाची विविधता हीच आपल्या देशाची ताकद : राष्ट्रपती

नवी दिल्ली : भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना संबोधित केले. देशातील सर्व उपलब्ध संसाधनांवर प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार आहे. देशाचा नागरिक हा कोणत्याही समाजाचा, समूहाचा असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील असो, आपन सर्व समान आहोत. विविधता हीच आपल्या देशाची खरी शक्ती आणि ओळख आहे.

भारताची विविधता, लोकशाही आणि विकास हा संपूर्ण जगासमोर एक आदर्श आहे. हा दिवस म्हणजे भारतीय लोकतंत्रावर आधारीत सर्वोत्तम आदर्शांना स्मरण्याची संधी आहे, असे त्यांनी भाषणात सांगितले. तसेच देशाच्या गणतंत्र दिवसाचे हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे, कारण यावर्षी २ ऑक्टोबरला आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करू असे सुद्धा त्यांनी सांगितले.

महात्मा गांधीजींनी त्यांच्या विचारातून प्रत्येकालाच दिशा दाखवली आहे. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर आशिया, आफ्रिका आणि जगातील इतर देशांत साम्राज्यवाद नष्ट करण्यासाठी जनमानसात आत्मविश्वास जागा केला आहे आणि त्यांना सुद्धा स्वातंत्र्याची दिशा दाखवली आहे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x