7 May 2025 2:29 PM
अँप डाउनलोड

VIDEO: गोंदियात मोदींच्या सभेसाठी प्रति १००-१५० रुपये देऊन गर्दी जमवली

Narendra Modi, BJP, Devendra Fadanvis

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल गोंदियात जाहीर सभा पार पडली. याआधी मेरठ आणि वर्धा येथील सभेत गर्दी न झाल्याने भारतीय जनता पक्ष आणि मोदींची मोठी नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र गोंदियात भारतीय जनता पक्षाने विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले, परंतु त्यातही ते पकडले गेले असंच म्हणावं लागेल. कारण लोकं मोदींना ऐकण्यासाठी स्वतःहून आले नाही तर ही गर्दी पैसे देऊन जमा करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या पाहणीतून रेकॉर्डवर आलं आहे. त्यामध्ये १०० रुपयांपासून ते प्रति गाडी ५०० रुपयांपर्यंत असं पैसे वाटप करून सभेसाठी लोकांनी आणण्यात आल्याचं स्वतः लोकांनीच कॅमेऱ्यावर मान्य केले.

मेरठ आणि वर्धा येथील मोदींच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्यानंतर गोंदियातील सभेत भाजपाने गर्दी जमवण्याकडे विशेष लक्ष दिले होते. गोंदियात भाजपातर्फे अनेकांना व्हीआयपी पास वाटण्यात आले होते. व्हीआयपी पास मिळाल्याने अनेक जण सभास्थळी मोदींना पाहण्यासाठी आले होते. वर्धा येथील सभेतही व्हीआयपी पास छापण्यात आले होते. परंतु, तो आकडा १५० ते २०० इतका होता, असे समजते. पण गोंदियात मात्र हजारो व्हीआयपी पास छापण्यात आल्याचे समजते. याबाबत भाजपाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी नेमका आकडा उपलब्ध नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. व्हीआयपी पाससोबतच पैसे देऊनही गर्दी जमवण्यात आली होती. सिग्नल टोळी या गावातील काही महिलांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया दिली आहे. १५० रुपये मिळाल्याचे या महिलांनी मान्य केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या