5 May 2025 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

'थँक्यू गोडसे, नोटांवरून गांधींचा फोटो हटवा' महिला IAS अधिकाऱ्याचं धक्कादायक ट्वीट

Narendra Modi, RSS

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे एक महिला आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. निधी चौधरी असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी १७ मे रोजी महात्मा गांधीविषयी अत्यंत खबळजनक आणि वादग्रस्त ट्वीट केलं होतं. पण नंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानं त्यानं आपलं ट्वीट डिलिट केलं, परंतु तोपर्यंत या ट्वीटचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल झाले होते. त्यामुळे आता महिला आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी एनसीपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

महात्मा गांधींविषयी ट्वीट करताना निधी यांनी महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना धन्यवाद दिले. त्यांनी लिहीलं, “महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ३०-१-१९४८ साठी थँक्यू गोडसे.”

निधी चौधरी यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. त्यानंतर त्यांनी आपलं ट्वीट डिलिट केलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी गांधींजींच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करत, लोकांनी माझ्या ट्वीटचा विपर्यास केला त्यामुळे मी माझं ट्वीट डिलिट केल्याचं स्पष्टीकरण दिलं. महात्मा गांधींचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता असंही त्यांनी आपल्या आत्ताच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. निधी चौधरी या आयएएस २०१२ बॅचच्या असून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) आहेत. याआधी त्या मुंबई महानगरपालिकेच्याच सहाय्यक कलेक्टर होत्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या