4 May 2025 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

ते स्वतःच निवडून येण्याची शास्वती नाही; त्यांच्या भरोसे स्वबळावर ही राजकीय आत्महत्या?

Ashok Chavan, Pruthviraj Chavan, Hussain Dalwai, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रापासून ते संपूर्ण देशभर सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार बैठका सुरु आहेत. त्यात आगामी विधानसभा निवडणुक राष्ट्रवादीला वगळून स्वबळावर किंवा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढवावी अशी मागणी पुढे आली आहे. मात्र काँग्रेसकडे आजच्या घडीला राज्य पातळीवरील चेहराच शिल्लक नसल्याने ते असं धाडस नेमकं कोणत्या आधारावर करत आहेत ते समजायला मार्ग नाही.

काँग्रेसचा पारंपरिक मतदार देखील त्यांच्याकडे राहिलेला नसल्याने असे निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल. त्यात राहुल गांधी विधानसभेत उतरल्यास अजूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, तर दुसरीकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण किंवा राज्यातील इतर कोणत्याही नेत्याच्या सभांना शंभर लोकं जमतील याची देखील शाश्वती देता येणार नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीलासोबत घेऊन जाणे म्हणजे स्वतःच भविष्यातील उरलं सूरलं अस्तित्व सुद्धा धोक्यात आणण्यासारखं आहे. राज्यातील आज काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेते पराभूत झाल्याने ते कोणत्या तोंडाने दुसऱ्याला निवडून आणण्याची धमक दाखवतील असा प्रश्न उरतो. त्यात स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊ शकतील असे विद्यमान आमदार स्वतःच वैयक्तिक राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पुन्हा भाजपच्या गळाला लागतील यात अजिबात शंका नाही.

आजच्या घडीला विधानसभा निवडणुकीचा विचार करता भाजप-शिवसेनेनंतर राज्यात निवडणुकीदरम्यान मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचाच दबदबा राहील असं सध्याचं राजकीय चित्र आहे. त्यात लोकसभेत आधीच सगळं बळ संपुष्टात आल्यानंतर पुन्हा स्वबळाचा नारा म्हणजे केवळ राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल. आधीच काँग्रेसच्या जहाजात कोणीही बसण्यास तयार नाही आणि काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतल्यास, राष्ट्रवादी थेट मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर छोट्या पक्षांना एकत्र घेऊन वेगळीच आघाडी निर्माण करतील आणि काँग्रेसची अवस्था अजूनच भीषण होईल असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या