6 May 2025 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Middle East Crisis | उन्मत्त इस्रायल जगभरातील वातावरण दूषित करतोय, शेजारच्या सीरिया आणि लेबनॉन देशांवर सुद्धा हल्ला केला

Middle East Crisis

Middle East Crisis | इस्रायल-हमास युद्धाचा आज 24 वा दिवस आहे. दरम्यान, गाझा पट्टीत इस्रायली सैन्याने अल-कुद्स हॉस्पिटलजवळ बॉम्बहल्ला केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ८००० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात बहुतांश लहान मुले आहेत. ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे की, गाझामध्ये २०१९ पासून दरवर्षी जगभरातील संघर्षात मारल्या गेलेल्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त मुले गेल्या तीन आठवड्यांत मारली गेली आहेत.

अल जझीराच्या वृत्तानुसार, गाझावर सातत्याने हल्ले होत असताना इस्रायलने शेजारच्या सीरिया आणि लेबनॉनमधील लष्करी पायाभूत सुविधांवरही हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हद्दीत यापूर्वी डागण्यात आलेल्या रॉकेटला प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या लढाऊ विमानांनी सीरिया आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवर रॉकेट लाँचरद्वारे हवाई हल्ले केल्याची माहिती इस्रायल सुरक्षा दलाने (आयडीएफ) सोमवारी पहाटे दिली.

मात्र, इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत अधिक माहिती दिलेली नाही. इस्रायलचे लष्कर हिजबुल्लाह या लेबनॉनच्या सशस्त्र गटासोबत सीमेपलीकडून लढा देत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.

दुसरीकडे हमासविरोधात युद्ध सुरू केल्यापासून सीरियावर वारंवार हवाई हल्ले ही केले आहेत. गाझा पट्टी, लेबनॉन आणि सीरियावर इस्रायली लष्कराकडून होणारे आक्रमक हल्ले संपूर्ण मध्यपूर्वेत व्यापक संघर्षात रुपांतरित होऊ शकतात, असे या अहवालात म्हटले आहे.

दुसरीकडे सीरिया तसेच इराकमध्ये आपल्या सैन्यावर रॉकेट आणि ड्रोन हल्ले झपाट्याने वाढल्याने अमेरिकेनेही सीरियावर हल्ला केला आहे. अमेरिकेने इराणसमर्थित दहशतवादी संघटनांना आपल्या लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार धरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या परवानगीनंतर अमेरिकेच्या सैनिकांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि इराणसमर्थित गटांनी सीरियातील दोन दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचे पेंटागॉनने गेल्या आठवड्यात म्हटले होते.

अनेक देश युद्धात ओढले जाणार?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलने हमासविरोधात युद्ध सुरू ठेवल्यास प्रादेशिक तणाव वाढेल, असे म्हटले होते. मुस्लिम आणि प्रतिकार शक्ती अधीर होतील आणि त्यांना कोणीही रोखू शकणार नाही, असे खामेनी म्हणाले होते. गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही इस्रायलने गाझावर बॉम्बफेक थांबवली नाही तर हा संघर्ष मध्यपूर्वेच्या सीमेपलीकडे पसरू शकतो, असा इशारा दिला होता. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही रविवारी एबीसी न्यूजशी संवाद साधला.

News Title : Middle East Crisis Israel Defence forces airstrike on Syria and Lebanon 30 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Middle-East-Crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या