21 May 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत, पण कोणता शेअर ठरतोय सर्वाधिक परतावा देणारा?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | मागील वर्षी जानेवारी 2023 मध्ये अमेरिकेतील हिंडेनबर्ग फर्मने अदानी समुहाच्या विरोधात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यांनतर अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते. आता अदानी समूह हिंडनबर्ग फर्मच्या आरोपातून मुक्त झाला आहे. त्यामुळे अदानी समुहाचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.

भारताच्या निष्पक्ष सर्वोच्च न्यायालयाने देखील अदानी समूहाला चांगला दिलासा दिला आहे. असे असून देखील अदानी समुहाचे शेअर्स आपली पूर्वीची तेजी प्राप्त करू शकले नाहीये. अदानी समुहाच्या काही कंपन्यांचे शेअर्स अजूनही विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.

अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स आपल्या मागील वर्षाच्या किमतीच्या तुलनेत 74 टक्के खाली आहेत. एका वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3805.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के वाढीसह 984.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याच काळात अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने जवळपास दुप्पट वाढ नोंदवली आहे. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी 0.048 टक्के वाढीसह 2,920.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पूर्वी अदानी ट्रान्समिशन या नावाने ओळखली जाणारी कंपनी आता अदानी एनर्जी सोल्युशन्स या नावाने ओळखली जाते. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांपेक्षा जास्त कमजोर झाले आहेत. आज या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 1,053.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 566 रुपयेवरून घसरून 356.60 रुपये किमतीवर आले होते.

मागील एका वर्षात अदानी ग्रीन कंपनीच्या शेअर्समध्ये 18.18 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी 1954.30 रुपये किमतीवर घसरलेला स्टॉक आता देखील 1599 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे. अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरची किंमत 2184 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवरून 439.10 रुपये किमतीवर आली होती.

अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात दुप्पट वाढले आहेत. या काळात शेअर्सची किंमत 277.40 रुपयेवरून 90.94 टक्के वाढली आहे. आज शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी हा स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 534.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात अदानी पोर्ट्स कंपनीचा शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 1,156.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 20 January 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x