2 May 2025 8:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

बॉलिवूडच्या 'बाबा'चे वयाच्या ६०व्या वर्षात पदार्पण

sanjay Dutt, Bollywood actor Sanjay Dutt, Sanju Baba, Khalnayak, TADA, Mumbai Bomb Blast, Sunil Dutt, Bollywood, Filmy

मुंबई : संजय दत्त म्हणजेच बॉलिवूडचे संजू बाबा आज ६० वर्षाचे झाले. अभिनेते सुनील दत्त व नर्गिस दत्त यांच्या पोटी संजय दत्त यांचा जन्म २९ जुलै १९५९ रोजी झाला. बॉलिवूड मध्ये संजय दत्त यांचं पदार्पण १९८१ मध्ये रॉकी ह्या चित्रपटातून झाले. संजय दत्त यांनी आपल्या पदार्पणानंतर अनेक हिट सिनेमे केले. १९८५ मधील नाम, १९८८ मधील जीते हैं शान से, मर्दो वाली बात, १९८९ मधील इलाका, हम भी इन्सान है आणि कानून अपना अपना असे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे त्यांनी त्या काळी प्रेक्षकांसाठी केले.

संजय दत्त यांना १९९१ मध्ये साजन साठी व १९९३ मध्ये खलनायक ह्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता ह्या श्रेणीत नामांकन मिळाले. १९९९ मध्ये संजय दत्त यांना त्यांच्या वास्तव ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. २००३ मधील मुन्ना भाई एम. बी. बी. एस आणि २००६ मधील लगे राहो मुन्ना भाई मधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. १९९३ मध्ये संजय दत्त यांना टाडा ऍक्ट च्या कल्मेखाली अटक करण्यात आले. अनेक वेळा जेल च्या फेऱ्या करून व त्या नंतर त्यांची उरलेली शिक्षा भोगून २०१६ मध्ये संजय दत्त यांची जेल मधून अखेर सुटका झाली.

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या संजू ह्या चित्रपटाने संजू बाबा ह्यांच्या बद्दलची प्रेक्षकांमध्ये असलेली निगेटिव्ह इमेज पूर्णतः पुसुन काढली. आज संजू बाबा ह्यांच्या ६०व्या जन्मदिवशी त्यांनी आपल्या नवीन येणाऱ्या सिनेमा के.जी.एफ मधील आपला एक पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंट’वर लाँच केला आहे व त्यांची आणखी एक येणारा चित्रपट प्रस्थानाम ह्याचा टिझर लाँच केला.

 

View this post on Instagram

 

Can’t imagine my life without you @maanayata! Happy Birthday my love ❤

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या