11 May 2025 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मुंबईत होणार पहिलं मराठी सोशल मीडिया संमेलन

Mumbai, Social Media, Social Media Summit 2019

मुंबई : आताच्या काळात लोक आणि नवनवीन गोष्टी यांच्यातला दुवा सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामुळे येणाऱ्या नवनवीन गोष्टी सहजरित्या स्वीकारू लागले आहेत. नियतकालिकांमधील लेख, पत्र, पुस्तके, यानंतर आता ब्लॉग सुरु झाले. ब्लॉगपालिकडे मग इतर सोशल मीडियावर थोडक्यात अभिव्यक्त होण्याच्या पायंडाही मराठीने सहज स्वीकारला. यामुळे अनेक गोष्टींवर लोकांना व्यक्त होता आला.

आपली मत मांडता आली. कित्येक प्रश्न चर्चमधून सोडवता आले. काही विषयांवर सवांद रंगले. हेच संवाद आणि अभिव्यक्ती यांना डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी या संस्थेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळणार आहे. पुढील आठवड्यात १७ आणि १८ ऑगस्ट रोजी पहिले मराठी सोशल मीडिया संमेलन मुंबईत आजोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाद्वारे सोशल मीडियावर मराठी भाषेत व्यक्त होणाऱ्या लेखक, कवी, नट, चित्रकार, विचारवंत, छायाचित्रकार, इत्यादी व्यक्तींना एक मंच मिळणार आहे.

या मंचावर कायदा, राजकारण, व्यवसाय, इतिहास, ग्रामीण साहित्य अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे लोक एकत्र आणून सर्वांगीण चर्चा घडवून आणणे आणि त्यातून एक चळवळ उभी करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. यामुळे एक पायंडा रुजेल व आपल्या कलात्मतक देवाण घेवाणीतून मराठी भाषाही समृद्ध होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या