3 May 2025 2:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शिवसेनेला धक्का! कल्याणमधील २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे

Dombivali Shivsena, Kalyan Shivsena

डोंबिवली: ‘आमचं ठरलंय’ असे सांगून निवडणुकीत युती करणाऱ्या शिवसेना-भारतीय जनता पक्षामधील स्थानिक पातळीवरील संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे सपुर्द केले आहेत. जागावाटपावरून ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष-शिवसेनेसह सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सत्ताधारी वर्चस्वासाठी, तर विरोधी पक्ष अस्तित्वासाठी लढत आहेत. सर्वत्र पक्षांतराचे वारे वाहत असतानाच, ठाण्यातील कल्याणमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेत तिकीट वाटपावरून मोठी नाराजी पसरली आहे. कल्याण, डोंबिवलीमधील शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहेत. जागावाटपावरून हे नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने केवळ शिवसेनाच नव्हे तर भारतीय जनता पक्षासमोरील अडचणी देखील वाढल्या आहेत. कारण महायुतीत काही ठिकाणी शिवसेनेचाही दबदबा आहे. परंतु, यावेळी काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. अशावेळी उमेदवाराला स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांपैकी काही अपवाद वगळले तर जवळपास प्रत्येक मतदारसंघात भारतीय जनता पक्षा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयातील दरी अगदी स्पष्टपणे जाणवत आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम या मतदारसंघांत या दोन्ही पक्षांत उघडपणे बंड झाल्याने त्याचे पडसाद आता जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पाहायला मिळू लागले आहेत.

कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर येथील नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केल्याने भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड दुखावले गेले आहेत. बोडारे हे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिंदे यांचे पाठबळ असल्याशिवाय बोडारे बंड करणे शक्यच नाही, असा गायकवाड समर्थकांचा होरा आहे. त्यामुळे बोडारे यांची बंडखोरी होताच गायकवाड यांनी थेट पालकमंत्र्यांवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर येथे शिवसेनेची फळी अधिक ताकदीने बोडारे यांच्यामागे उभी राहिल्याचे चित्र आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या