4 May 2025 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मुख्यमंत्री सेनेचाच हवा ही शेतकऱ्यांची सुद्धा मागणी : संजय राऊत

BJP, Shivsena, MP Sanjay Raut

मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. मराठवाड्यात उद्धव ठाकरे गेले होते. तसंच आदित्य ठाकरेही अनेक भागांमध्ये गेले होते. शेतकरी आणि कष्टकरी शिवसेनेकडे आशेने पहात आहेत. काहीही झालं तरीही चालेल मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आता नव्याने काय सांगायचं? कुठलाही नवा प्रस्ताव नाही जे आधी ठरलंय तेच शिवसेनेचं म्हणणं आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला असून, लवकरत महायुतीचे सरकार स्थापन होईल असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर म्हटले होते. सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेने कोणताही प्रस्ताल दिला नसल्याचे पाटील यांनीही तेव्हा म्हटले आहे. शिवेसेना लवकरच आम्हाला प्रस्ताव देईल आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे २४ तास उघडे असल्याचे पाटील म्हणाले. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊनच सरकार स्थापन करेल असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, शिवसेना मुख्यमंत्री पद घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हणणारे लवकरच तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. कारण सर्व खटाटोप हा केवळ इतर महत्वाची मलईदार मंत्रिपदं पदरात पाडून घेण्याच्या चर्चा पडद्याआड सुरु होत्या आणि लवकरच त्या पूर्णत्वाला येताच शिवसेना पलटी मारण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. भारतीय जनता पक्षाकडेच संपूर्ण कार्यकाळ म्हणजे ५ वर्षे मुख्यमंत्रिपद आणि त्यामोबदल्यात शिवसेनेला मलईदार महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी मंत्रिपदे, असा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला जवळपास पडद्याआड निश्चित झाला असून याची घोषणा पुढील १-२ दिवसांत होईल, अशी माहिती प्रसार माध्यमांच्या हाती आली आहे.

समोरासमोर सत्तास्थापनेबाबत दोन्ही पक्षांमध्ये थेट चर्चा सुरू झाली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू मध्यस्थांमार्फत मागील ८ दिवस सर्व बोलणी सूर होत्या अशी माहिती पुढे आली आहे. त्या माध्यमातूनच हा फॉर्म्युला निश्चित केला गेला असल्याचं समजतं. पडद्याआड सर्व सुरळीत असल्याचं माहित असल्यानेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे इतर कामात आणि दौऱ्यात बिनधास्त व्यस्त होते. परंतु शिवसेनेने खासदार संजय राऊत यांना केवळ माध्यमांवर पुड्या सोडण्यासाठीच ठेवलं होतं का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.

निकालाच्या दिवसापासूनच सत्तास्थापनेचा पेच महाराष्ट्रासमोर आहे. शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं संजय राऊत यांनी वारंवार सांगितलं. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार का? अशाही चर्चा रंगल्या. असं सगळं वातावरण असतानाच सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजतं आहे. भाजपाने याआधी शिवसेनेला १३ मंत्रिपदं ऑफर केली होती. मात्र मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडायचा असेल तर निम्मी मंत्रिपदं द्या अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या