3 May 2025 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

गोरगरीबांसाठी १० रूपयांत शिवभोजन योजना जाहीर

Chief Minister Uddhav Thackeray, Promises of Meal in ten rupees

गोरगरिब जनतेसाठी लवकरच शिवभोजन योजना सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेला १० रूपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली. सुरूवातीच्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं आणखी केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

राज्यात सत्ता आल्यास भुकेल्यांना १० रुपयांत भोजन देण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. शिवसेनेचे हे आश्वासन सोशल मीडियावर विनोदाचा विषय ठरले होते. मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० रुपयांत थाळीबाबत दिलेले आश्वासन पाळले असून, राज्यात १० रुपयात थाळी देण्याची घोषणा आज विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली.

अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरं देखील दिली. राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर २०१९ पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी २ लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. तसेच गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार असल्याची घोषणा देखील ठाकरे यांनी केली. ही योजना प्रायोगिक तत्वावर राज्यात ५० ठिकाणी सुरु होणार आहे.

 

News English Summery: Shiv Bhojan Yojana will be launched soon for the poor people. Chief Minister Uddhav Thackeray informed that the people will be given Rs. In the initial phase, 50 centers of Shivbhojan Yojana will be started. He further said that more centers will be expanded in phases. The Chief Minister spoke on various points during his speech. Shiv Sena had in its manifesto promised to provide food to the hungry for Rs. The Shiv Sena’s assertion had become a joke on social media. However, the Chief Minister and Shiv Sena party chief Uddhav Thackeray have kept promises of Rs. 10 rupees.

 

Web Title:  Chief Minister Uddhav Thackeray fulfill Promises of Meal in ten rupees.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या