17 June 2024 7:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही; पवारांचा राज ठाकरेंना टोला

MNS Chief Raj Thackeray, NCP Chief Sharad Pawar

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला. या विजयामुळे मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही. हा विजय निश्चित होताच. यापूर्वी इतर काही राज्यात भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता दिल्लीतही पराभव झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या पराभवाची मालिकाच सुरु झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. दिल्लीत आपचा विजय झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतचे कल पाहता आम आदमी पक्षानं दिल्ली पुन्हा राखल्याचं चित्र आहे. सीएए, एनआरसीसारख्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून भाजपनं दिल्लीत जोरदार प्रचार केला होता. भाजपची सत्ता येणारच असा दावा निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होता. मात्र, भाजपची पुरती पीछेहाट झाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार आम आदमी पक्ष ६२ जागी तर, भाजप अवघ्या ८ जागी आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया येत आहेत.

पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज ठाकरेंच्या ९ फेब्रुवारीच्या भाषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रातला एक नेता दगडाच्या बदल्यात दगड आणि तलवारीच्या बदल्यात तलवारीने उत्तर देईल अशी भाषा करतो आहे त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते जे बोलून गेले.. या नेत्यांची भाषणं ऐकायला आणि पाहायला लोक येतात” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Do not take MNS Chief Raj Thackerays speeches seriously says NCP Chief Sharad Pawar.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x