12 May 2025 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

पुलवामा: शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, अनेक आश्वासनांची पूर्तता नाहीच

CRPF, Pulwama Terror Attack

नवी दिल्ली: पुलवामा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. भारतीय सैन्याच्या तब्बल ४० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विदारक घटनेचे व्रण प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजे आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष लोटलं. या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्यानं अवघा देश हादरला, मात्र वर्ष उलटूनही काही शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अक्षरश: हेलपाटे घालावे लागत आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांना अनेक आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झाली नाही.

युपी’मध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय संजू देवींचे पती महेश कुमार या हल्ल्यात शहीद झाले. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घरी येऊन अनेक आश्वासानं दिली, असं संजू देवी म्हणाल्या. महेश कुमार यांना २ मुलं आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जाईल असं आश्वासन संजू देवींना देण्यात आलं होतं मात्र अद्यापही मुलांच्या शिक्षणासाठी खर्च मिळाला नाही असं संजू देवी म्हणाल्या. शिकवणी करून घरचा खर्च भगवावा लागत असल्याचं त्या म्हणाला. तसेच घरासमोर पक्का रस्ता, शहीद पतीचे स्मारक आणि उद्यान बांधून देण्याचं आश्वासनही राजकीय पक्षांनी दिलं होतं, मात्र त्यातही आश्वासानांचा विसर पडल्याची खंत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलनाता व्यक्त केली.

आग्राच्या शहीद कौशल कुमार रावत यांच्या कुटुंबीयांमध्येही सरकारी यंत्रणांविषयी नाराजी आहे. राज्य सरकारनं त्यांना २५ लाखांची मदत, कुटुंबीयातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र कौशल यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. कौशल यांच्या स्मारकाचाही अपमान झाला असल्याची नाराजी त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. स्मारकाजवळ शहीद कौशल कुमार रावत यांच्या नावातही चूक असून त्यांचं नाव अत्यंत लहान अक्षरात लिहिण्यात आलं हे तर गावच्या सरपंचांचं आणि इतर राजकीय नेत्यांची नावं मोठ्या अक्षरात आहेत. स्थानिक नेत्यांनी स्मारकावर माझ्या शहीद नवऱ्याचं नाव अत्यंत लहान अक्षरात लिहून त्यांच्या अपमान केला आहे, अशी नाराजी ममता राव यांनी व्यक्त केली आहे.

बिहारच्या शहीद रतन कुमार ठाकूर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली आहे, मात्र त्यांच्या कुटुंबीयांना घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता वर्ष उलटलं तरी झालेली नाही. राजस्थानमधील भरतपूर येथील शहीद सीआरपीएफ जवान जीताराम यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं. गुजर यांच्या कुटुंबीयांना २५ लाखंची आर्थिक मदत मिळाली आहे मात्र नोकरीच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. गावातल्या शाळेस शहीद गुजर यांचे नाव देण्याचं आश्वासन स्थानिक नेत्यांनी दिले होते त्या आश्वासनाची देखील पूर्तता व्हायची आहे, असं त्यांचे वडील राधे श्याम म्हणाले.

तर दुसरीकडे उमेश गोपीनाथ जाधव यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मूळ गावी जाऊन तेथील माती जमा केली आहे. यासाठी त्यांना संपूर्ण देशात तब्बल ६१ हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात जाधव यांचा प्रवास संपला या प्रवासाला जाधव मोठ्या अभिमानाने ‘तीर्थ यात्रा’ असं संबोधतात. प्रत्येक जवानाच्या गावी जाऊन येथील माती एका कलशामध्ये जमा करुन सर्व कलश एकत्र करुन जाधव श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

तत्पूर्वी सीआरपीएफने गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर एक ट्विट केलं होतं. ‘आम्ही विसरणार नाही, आम्ही माफ करणार नाही. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करतो आणि आपल्या शहीद बांधवांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही उभे आहोत. या भयंकर हल्ल्याचा बदला घेतला जाईल’ असं ट्विटमध्ये म्हटलं होतं.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष लोटलं. या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्यानं अवघा देश हादरला, मात्र वर्ष उलटूनही काही शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अक्षरश: हेलपाटे घालावे लागत आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांना अनेक आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झाली नाही.

 

Web Title: Story families of CRPF troopers killed in Pulwama terror attack say few promises honored.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या