3 May 2025 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये - संजय राऊत

Covid 19, Corona Crisis, MP Sanjay Raut

मुंबई, १९ एप्रिल:  शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर घेण्याची मंत्रिमंडळाने शिफारस करुनही राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. यावरुन राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’, असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. असंविधानिकरित्या वागणाऱ्यांना इतिहास माफ करत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर काही दिवसांपूर्वी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं टीका केली होती. राज्यपाल भवनातून काड्या करण्याचे उद्योग केले जात असल्याचं शिवसेनेनं म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपाचं नाव न घेता ट्विट करून टीका केली आहे.

दुसरीकडे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी देखील राज्यपालांनी कटुता, सुडबुद्धी न बाळगता विधान परिषद सदस्यत्वासाठीची शिफारस मंजूर करावी, असं मत व्यक्त केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी क्षत्रिय व्हावं, विरोधक होऊ नये. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन उद्धव ठाकरेंसाठी परवानगी आणावी, असं देखील काकडेंनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Shiv Sena leader and Rajya Sabha member Sanjay Raut has indirectly criticized Governor Bhagat Singh Koshari. The cabinet has not yet decided on the recommendation of the Cabinet to appoint Chief Minister Uddhav Thackeray as the appointed member of the Governor. Raut has targeted the governor.

News English Title: Story Maharashtra Ra Bhavan should not be center for political conspiracy says Shivsena MP Sanjay Raut News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या