3 May 2025 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

संकट आहे, पण त्यावर मात करण्याचा आपला इतिहास; नक्कीच जिंकू: शरद पवार

Sharad Pawar, Facebook LIVE, Corona Crisis, Covid 19

मुंबई, ३० एप्रिल : लॉकडाउनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभं राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असं आवाहनही केलं. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असल्याने संख्या वाढत असल्याचं सांगितलं.

‘कोरोनाच्या रूपानं आज राज्यावर संकट आलंय. मात्र, संकटांवर धैर्यानं मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. उद्याचा महाराष्ट्र दिन साजरा करताना या इतिहासाचं स्मरण करून कामाला लागू या. यश नक्कीच मिळेल,’ असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला.

तसेच कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर हजारो लोक बेरोजगार होतील याची चिंता आहे. अनेकांना नोकरीवरुन काढण्यात येईल असं दिसतं. महामारीतून बाहेर पडल्यानंतर मनुष्यबळ लागेल त्याचाही विचार करावा लागेल. परराज्यातील लोक पुन्हा त्यांच्या राज्यात परतले आहेत. अनेक राज्यात कामगारांनी स्थलांतरण केलं आहे त्यामुळे बेरोजगारी आणि मनुष्यबळ ही समस्या उद्भावण्याची शक्यता असल्याचं शरद पवारांनी सांगितले.

या संवादात त्यांनी मुंबईतील बॉम्बस्फोटांचा दाखलाही दिला. ते म्हणाले, ‘त्या वेळीही अनेक लोक मारले गेले होते. पण तेव्हाच्या शासकीय यंत्रणेनं, पोलिसांनी २४ ते ३० तासांत पुन्हा संपूर्ण शहर रुळावर आणलं. जगभरातील पत्रकार इथं जेव्हा आले, तेव्हा इथं सगळे व्यवहार सुरळीत चाललेले पाहून ते चकित झाले होते. त्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही. या संकटावरही आपण खात्रीनं मात करू.’

आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी जीवाचा धोका पत्करुन रुग्णांची सेवा करत आहेत. पोलीस रात्रंदिवस कायदा सुव्यवस्था सांभाळत आहेत अशावेळी डॉक्टर, पोलिसांवर होणारे हल्ले वाढणार असतील तर त्यांचे मनोबल खच्चीकरण होईल. लोकांनीही संयमाने त्यांना सहकार्य करायला हवं. पोलिसांवर हल्ले वाढत असतील त्याबाबत कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली आहे. त्याचे परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

 

News English Summary: The state is in crisis today in the form of Corona. However, Maharashtra has a history of overcoming adversity with courage. Let’s commemorate this history while celebrating tomorrow’s Maharashtra Day. Success will surely come, ‘said NCP President Sharad Pawar with great confidence.

News English Title: We will win this war too says NCP President Sharad Pawar in Facebook Live News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या