2 May 2025 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

कोरोना संकटाला एकटे मोदी आणि भाजपा तोंड देऊ शकत नाही - माजी CJI काटजू

Corona crisis, Former Justice Katuj, PM Modi

नवी दिल्ली, ११ मे: कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ४१ लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

देशात कोरोना रूग्णांची संख्या ६७ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० रुग्ण मरण पावले आहेत. ताज्या माहितीनुसार, देशभरात एकूण रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. यांपैकी एकूण २ हजार २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २० हजार ९१७ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील सक्रिय प्रकरणांची संख्या ४४ हजार २९ इतकी आहे.

दरम्यान देशातील कोरोनाचं संकट, रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर काटजू यांनी ‘द वीक’साठी एक लेख लिहिला आहे. ‘देशासमोरील समस्या खूप मोठी आहे. या समस्येला एकटे मोदी आणि भाजपा तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी एक राष्ट्रीय सरकार स्थापन करावं. या सरकारमध्ये सर्वपक्षीय नेते, वैज्ञानिक, प्रशासकीय तज्ज्ञांचा समावेश असावा,’ असा सल्ला काटजू यांनी दिला आहे.

काटजूंनी त्यांच्या लेखात लेखात चर्चिल यांचं उदाहरण दिलं आहे. ‘इंग्लंडचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी मे १९४० मध्ये राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी इंग्लंडसमोर नाझी जर्मनीनं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चर्चिल यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं. त्यामुळे इंग्लंडच्या संसदेत विरोधी पक्षच नव्हता. कारण विरोधी पक्षालादेखील सरकारमध्ये स्थान देण्यात आलं होतं,’ असं काटजूंनी लेखात म्हटलं आहे.

 

News English Summary: Katju has written an article for The Week against the backdrop of the corona crisis in the country and the growing number of patients. ‘The problem facing the country is huge. Modi and BJP alone cannot face this problem. Therefore, they should form a national government. This government should include all party leaders, scientists, administrative experts, ‘advised Katju.

News English Title: Story corona virus Prime Minister Narendra Modi should form national government says retired supreme court justice Katju News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या