3 May 2025 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

मे अखेरपर्यंत पुण्यात ५ हजारांपर्यंत कोरोना रुग्णसंख्या असेल - महापालिका आयुक्त

Pune, Corona virus, Shekhar Gaikawad, Pune Municipal Commissioner

पुणे, १६ मे : कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भविष्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोविड रुग्णांलयाची उभारणी करण्यावर भर दिली आहे. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पावसाळ्यात जूनमध्ये रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे. दरम्यान, मुंबई आणि उपनगर ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तर पनवेल, उरण या ठिकाणीही रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या काही तासात ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८७२ झाली आहे, काल दिवसभरात कोरोनाचे ९३ रुग्ण आढळले होते. दिवसभरातली रुग्णसंख्या पाहाता कोरोनाचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रादुर्भाव होतोय. औरंगाबाद शहरात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

पुणे शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरात आढळणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या करोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही रुग्णसंख्या सुमारे ५ हजारांपर्यंत असेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, पुणे शहरात काल अखेरपर्यंत ३ हजार ९३ इतकी रुग्णसंख्या होती. यांपैकी १ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या पुणे शहरातील अनेक रूग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहरात ५ हजार रुग्ण असतील अशी शक्यता त्यांनी व्यक्ती केली.

 

News English Summary: At present, considering the number of patients with coronary heart disease and discharge, by the end of May, this number will be around 5,000, said Municipal Commissioner Shekhar Gaikwad.

News English Title: There will be Five thousand patients in Pune till the end of May month says Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या