2 May 2025 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मुंबईच्या लाईफलाईन सेवेबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री रेल्वेमंत्र्यांशी बोलणार

CM Uddhav Thackeray, Sharad Pawar, Local Train, Lockdown

मुंबई, २३ मे : राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित झाले. त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत. यावेळी ते मुंबईची लाईफलाईन सुरु करण्याची विनंती रेल्वेमंत्र्यांना करतील.

दुसरीकडे भारतीय रेल्वेने राजधानी स्पेशल गाडीच्या रिझर्व्हेशन पद्धतीमध्ये बदल केला आहे. या गाड्यांसाठी अ‍ॅडव्हान्स रिझर्व्हेशन पीरियड दिवसांवरून दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेकडून १५ राजधानी एक्सप्रेस स्पेशल ट्रेन चालवत आहे. आता या गाड्यांसाठी तात्काळ बुकिंग सेवा उपलब्ध नाही आहे. या गाड्यांमध्ये RAC आणि वेटिंग लिस्ट सुद्धा जारी करण्यात येईल. मात्र वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्यांना प्रवास करता येणार नाही. ४ तास आधी प्रवाशांचा पहिला चार्ट जारी केला जाईल तर दुसरा चार्ट दोन तास आधी जारी केला जाईल. भारतीय रेल्वेने १ जून २०२० पासून सुरू होणाऱ्या विशेष ट्रेनसाठी बुकिंग सुरू केले आहे.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले. राज्यात आज ८५७ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

News English Summary: An important meeting between Chief Minister Uddhav Thackeray and NCP supremo Sharad Pawar was held on Saturday against the backdrop of lockdown in the state. At this time, the two leaders agreed to start a local train in Mumbai.

News English Title: CM Uddhav Thackeray and Sharad Pawar agreed to start a local train in Mumbai News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या