2 May 2025 8:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मुंबई २६/११ हल्ला : मास्टरमाईंड तहव्वूर हुसैनला अमेरिकेत अटक

Mastermind terrorist, Tahavur Hussain Rana, arrested in the United States

मुंबई, २० जून : मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ हल्ल्याचा कट रचलेल्या मास्टर माईंड दहशतवादी तहव्वूर हुसैन राणाला अमेरिकेत अटक करण्यात आलं आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधून राणाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राणाचं भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. राणा हा पाकिस्तान – कॅनडाचा नागरिक असून अमेरिकेने या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून शिक्षाही केली होती.

दोनच दिवसांपूर्वी राणाला तुरुंगातून सोडण्यात आले होते. मात्र, अमेरिकन प्रशासनाने त्याला पुन्हा अटक केली आहे. असे म्हटले जात आहे की, ट्रम्प प्रशासन भारताला मोठी मदत करत आहे. राणाच्या भारतातील प्रत्यार्पणाची आवश्यक कागदपत्रे तयार केली जात आहेत. राणाची शिक्षा २०२१मध्ये संपणार आहे. मात्र, त्याला त्याआधीच सोडून देण्यात आले होते.

या हल्ल्य़ाप्रकरणी अमेरिकेमध्ये तहव्वूर राणला अटक झाली होती. त्याच्यावरही खटला सुरु होता. अखेर अमेरिकी न्यायालयाने त्याला २०१३ मध्ये १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या हल्ल्याचा मोठा मास्टरमाईंड पाकिस्तानचे संरक्षण असलेला हाफिज सईद उघड माथ्याने पाकिस्तानात फिरत आहे. राणा भारताच्या हाती आल्यास पुन्हा पाकिस्तानविरोधात भारताला आक्रमक होता येणार आहे.

राणाच्या प्रत्यार्पणाची कागदपत्रे तयार करणे काहीसे कठीण काम आहे. या प्रकरणामध्ये पाच प्रशासकीय संस्था येतात. भारताचे परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, कायदे मंत्रालय आणि अमेरिकेचे परराष्ट्र आणि कायदे मंत्रालय या सर्वांची वेगवेगळी प्रत्यार्पण प्रक्रिया आहे. यामुळे या पाचही विभागांना ताळमेळ ठेवून काम करावे लागणार आहे.

 

News English Summary: Mastermind terrorist Tahavur Hussain Rana has been arrested in the United States for plotting the 26/11 attacks in Mumbai in 2008. Rana has been arrested from Los Angeles, USA. Therefore, it is being said that Rana is likely to be extradited to India.

News English Title: Mastermind terrorist Tahavur Hussain Rana has been arrested in the United States for plotting the 26/11 attacks in Mumbai in 2008 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या