महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा व बांग्लादेशपेक्षाही जास्त कोरोनाबाधित

मुंबई, २३ जून: देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १४ हजार ९३३ रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरातील करोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार २१५ वर पोहोचली.गेल्या २४ तासांत ३१२ करोनाबळींची नोंद झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १४ हजार ११ झाली आहे. आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार १९० रुग्ण बरे झाले. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७७ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात १ लाख ७८ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई, दिल्लीसह करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या शहरांमध्ये नमुना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. ७२३ सरकारी आणि २६२ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये चाचण्या केल्या जात असून गेल्या २४ तासांमध्ये दीड लाख चाचण्या घेण्यात आल्या.
धक्कादायक गोष्ट म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्व देशांच्या यादीत महाराष्ट्रानेही जागा मिळवली आहे. महाराष्ट्रात १ लाख ३५ हजार ७९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि बांग्लादेशपेक्षाही जास्त कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक बाब आहे.
कोरोना बळींच्या संख्येच्या बाबतीतही तिच स्थिती आहे. अनेक देशांपेक्षा जास्त बळी महाराष्ट्रात गेले आहेत. महाराष्ट्रात ६ हजार २८३बळी कोरोनाने घेतले आहेत. देशात गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत १४ हजार ९३३ ने वाढ झाली आहे. दुसरीकडे अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण हे दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये ४० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे.
News English Summary: The shocking thing is that Maharashtra has also got a place in the list of all the countries affected by corona. In Maharashtra, 1 lakh 35 thousand 796 cases of corona have been registered. At present, Maharashtra has more corona-affected areas than China, South Africa, Canada and Bangladesh.
News English Title: Shocking thing is that Maharashtra has also got a place in the list of all the countries affected by corona News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN