3 May 2025 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

कोरोनावरील टॉसिलिझीम ४०० एमजी इंजेक्शनचा काळा बाजार

Toxilism 400 MG 5, injection sold, Covid 19, Corona Virus

मुंबई, ११ जुलै: मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण समाधानकारक असले तरी कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. कारण काल शुक्रवारी मुंबई शहरात एका दिवसात ७३ जणांचा मृत्यु झाला. तर १४५४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले .

पालिकेच्या अहवालानुसार, काल मुंबईत दिवसभरात तब्बल २१८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ६८ टक्के झाले आहे. सध्या २२हजार ७३८ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. काल मृत झालेल्या रुग्णांमध्ये ७३ पैकी ५८ जणांना आधीचे दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ५३ पुरुष रुग्ण तर २० रुग्ण महिला होत्या. काल दिवसभरात ९० जणांना संशयीत रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल करून घेतले.

मुंबईसह राज्यातील अशा परिस्थितीत काही भामटे हे काळाबाजार करत असल्याचं समोर आले. प्रसार माध्यमांनी या प्रकाराबाबत वृत्त प्रसारीत केल्यानंतर आता टॉसिलिझिम ४०० एमजी इंजेक्शनच्या काळा बाजारावर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत मिरा रोड येथून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्य सरकारने आदेश देवून 24 तासही उलटले नाही तोच पोलीस दलाने आपले कौशल्य दाखवत टॉसिलिझीम 400 एमजी इंजेक्शनच्या काळा बाजारावर धडक कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई आहे.

मिरा रोड येथे दोन व्यक्ती रेमेडीसेव्हर आणि टॉसिलिझिम हे इंजेक्शन घेवून येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली असता पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाने सापळा लावून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे Covifor, Remdesivirinjection,100mg/20ml च्या 4 बॉटल सापडून आल्या. ज्यांची किंमत 21 हजार 600 रुपये नियमानुसार होती. तेच इंजेक्शन हे दोन व्यक्ती चढ्या भावाने विना परवाना विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

News English Summary: Following the media coverage of the drug, the black market for Toxicilizum 400 mg injection has been launched. Two persons have been arrested from Mira Road in this operation.

News English Title: Toxilism 400 MG 5 thousand injection sold for 21 thousand two peoples arrested at Mira Road News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या