3 May 2025 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

आज राज्यात कोरोनाचे तब्बल ८,१६९ रुग्ण वाढले, तर २२३ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, ११ जुलै : महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल ८,१६९ रुग्ण वाढले आहेत, तर २२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २,४६,६०० एवढा आहे. यातले ९९,२०२ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत, तर १,३६९८५ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५५.५५ टक्के एवढं झालं आहे.

राज्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजारांच्यावर गेली आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १०,११६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर ४.१ टक्के एवढा आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आत्तापर्यंत १२ लाख ८५ हजार ९९१ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५५.५५ टक्के इतके झाले आहे. तर मागील २४ तासांमध्ये राज्यात २२३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण मृत्यू हे १० हजारांच्याही पुढे गेले आहेत.

 

News English Summary: Maharashtra still has the highest increase in corona patients. In one day, the number of corona patients has increased by 8,169, while 223 deaths have been reported. The total number of corona victims in the state is 2,46,600.

News English Title: 8139 Covid19 Cases 4360 Discharged 223 Deaths Reported In Maharashtra Today News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या