11 May 2025 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या एकूण हालचाली 'आमचं ठरलंय' अशाच?

Disagreements, Chief Minister Ashok Gehlot, Deputy CM Sachin Pilot, Rajasthan

जयपूर, १२ जुलै : मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांमुळे राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान उद्या सकाळी १०.३० वाजता अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी नेमके चित्र स्पष्ट होऊ शकते.

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाकडून सांगण्यात आले आहे, की सर्वप्रथम राज्यस्थानमधील अशोक गहलोत सरकार पाडा. मात्र, भाजपाने त्यांना मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला आहे. कारण राज्यस्थानात नेतृत्वासंदर्भात भाजपांतर्गतही समस्या आहेत. वसुंधरा राजे यांच्या समर्थनात 45 आमदार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली असून त्यांना समजावले आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांच्यासाठी संदेश सोडला आहे असे पांडे यांनी संगितले. पीटीआयशी ते बोलत होते. राजस्थानमधल्या घडामोडींची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना माहिती देण्यात आली आहे. चौकशीला सर्वांनी सहकार्य करावे, असे पांडे यांनी सांगितले. भाजपा राजस्थानातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात ते यशस्वी होणार नाही असे अविनाश पांडे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा एकेकाळचा सहकारी सचिन पायलट यालाही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्रास देऊन बाजूला काढलं, हे पाहून मला दु:ख होतंय. काँग्रेसमध्ये प्रतिभा आणि क्षमता यांना काँग्रेसमध्ये फार कमी महत्त्व आहे, हे यावरून दिसत आहे,’ असं ट्विट ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं आहे.

 

News English Summary: Disagreements between Chief Minister Ashok Gehlot and Deputy Chief Minister Sachin Pilot have created political instability in Rajasthan. Meanwhile, a meeting of the Congress Legislative Party will be held at Ashok Gehlot’s residence at 10.30 am tomorrow.

News English Title: Disagreements between Chief Minister Ashok Gehlot and Deputy Chief Minister Sachin Pilot have created political instability in Rajasthan News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या