4 May 2025 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER
x

भाजप नेता म्हणतो गोमूत्र प्या कोरोनाला दूर ठेवा, काँग्रेस कार्यकर्त्याचा रम-अंडीचा सल्ला

Karnataka Congress, BJP Leader Ravichandra Gatti, Coronavirus, Rum And Eggs

कोलकाता, १९ जुलै : देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत आणि आता देशात समूह संसर्ग सुरु झाल्याची माहिती इंडियन मेडिकल कौन्सिलने दिली आहे. याच दरम्यान भाजपच्या एका नेत्याने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजब सल्ला दिला आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी एक विधान केलं आहे. लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे.

“गोमूत्र प्यायल्याने शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते” असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे. घोष यांनी एका बैठकीत लोकांना घरगुती गोष्टींचा उपयोग समजावून सांगितले आहेत. त्यावेळी त्यांनी गोमूत्र प्यायल्याने लोकांचं आरोग्य सुधारतं असा दावाही केला. तसेच गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत असं देखील म्हटलं आहे. त्यांच्या या अजब सल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

दुसरीकडे, मंगळुरुमधील उल्लाल शहरातील काँग्रेस नेता रविचंद्र गट्टी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गट्टी यांनी करोनावरील देशी उपचार सांगितला आहे. ते म्हणतात की, रम आणि दोन तळलेली अंड्याचं सेवन केल्यास करोनाचा पराभव केला जाऊ शकतो.

व्हायरल व्हिडीओमध्ये रविचंद्र गट्टी करोनाला पळवण्याचं औषधं सांगत आहेत. ते म्हणतात की, ‘९० मिली रममध्ये एक चमचा काळी मिर्ची टाका. त्यानंतर त्याचं मिश्रण चांगल्या पद्धतीन करा आणि प्या. त्यासोबत दोन अंड्यांचा ऑमलेट किंवा दोन फ्राय अंडी खा.’ करोनासोबत लढण्यासठी गट्टी यांनी हा देशी फॉर्मुला सांगितला आहे. त्यांनी स्वत त्याचं सेवन केलं आहे.

 

News English Summary: A BJP leader has given strange advice to protect against the corona virus. West Bengal BJP state president Dilip Ghosh has made a statement. People are advised to drink cow urine to avoid corona.

News English Title: Karnataka Congress Leader Ravichandra Gatti Says Coronavirus Can Be Beat By Rum And Eggs News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या