फडणवीस नागपूरला गेले तरी सुनील केदार, यशोमती ठाकूर यांना भेटायला गेल्याच सांगतील
कोल्हापूर, १९ जुलै : महाविकास आघाडीतील पक्षांना सध्या सरकार पडण्याची भीती वाटत आहे. या भीतीने सध्या त्यांना झोप लागत नाही. त्यासाठी सरकारमधील घटकांनी झोपेच्या गोळ्या घ्याव्यात, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला. तसेच तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असेही पाटील यांनी म्हटले. ते रविवारी कोल्हापूर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला साखर उद्योगातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गेले होते. मात्र, याचा अर्थ ते राज्य सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहेत असे म्हणणे गैर आहे. सत्तेबाबत सतत संशयित असलेल्या महाविकास आघाडीला झोप लागत नाही. सरकार हातून गेले की काय; या भीतीने ते सारखे दचकून उठतात, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे रविवारी लगावला.
“देवेंद्र फडणवीस त्यांच्या हालचालीवर राज्य सरकारने जणू कॅमेरा लावला आहे. त्यामुळे ते कुठेही गेले तरी त्याचा राजकीय अर्थ लावला जातो. उद्या ते नागपूरला घरी गेले तरी सुनील केदार, यशोमती ठाकूर यांना भेटायला गेले असे सांगितले जाईल. त्यामुळे थोडा जरी इशारा मिळाला तरी महाविकास आघाडीला त्यामध्ये गडबड वाटते,” असेही पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांचा समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून भाजप महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखीनच उधाण आले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सध्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये रस नसल्याचे स्पष्ट केले होते. सध्या आमचा फोकस कोरोना हाच असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले होते.
News English Summary: Even if he goes home to Nagpur, he will be told that he went to meet Sunil Kedar and Yashomati Thakur. Therefore, even if a little warning is given, the Mahavikas Aghadi feels that there is something wrong with it, ”said Chandrakant Patil.
News English Title: Even If Fadnavis Went To Nagpur Mahavikas Aghadi Follow Him Criticism by Chandrakant Patil News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY