29 April 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

बापरे! आज ९५१८ नवे कोरोना रुग्ण, २५८ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Records Highest Single Day, covid19, Corona Virus

मुंबई, १९ जुलै : राज्यात आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे.

मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्याही मोठी असून, गेल्या २४ तासात १ हजार ४६ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ६४ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा १,०१,२२४ इतका असून, आतापर्यंत एकूण ५,७११ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २३ हजार ८२८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती बृह्नमुंबई महापालिकेनं दिली आहे.

 

News English Summary: Today, 3906 patients have recovered and gone home in the state. The cure rate of patients is 54.62 percent and so far the total number has reached 1 lakh 69 thousand 569.

News English Title: Maharashtra Records Highest Single Day Spike In Cases News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x