9 May 2025 8:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

Mumbai Guardian minister Aslam Shaikh, Covid19

मुंबई, २० जुलै : देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आता मुंबईच्या पालकमंत्र्यांनाच कोरोनाने ग्रासले आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.

‘मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून मी स्वतःला विलग करून घेत आहे’, असे ट्विट अस्लम शेख यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याची विनंतीही केली आहे. तसेच ‘मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे’, असेही अस्लम शेख यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात याआधीही अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर काही नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस आणखीनच वाढत आहे. रविवारी राज्यात कोरोनाच्या 9518 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. रविवारी 3906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 69 हजार 569 झाली आहे.

 

News English Summary: Mumbai’s Guardian Minister has been attacked by Corona. Mumbai Guardian Minister and Congress leader Aslam Sheikh has contracted corona. Aslam Sheikh has informed about this on Twitter.

News English Title: Mumbai Guardian minister Aslam Shaikh tested positive for corona News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या