केरळमधील घटनेवरून महाराष्ट्र सरकारचा युजीसवर निशाणा

मुंबई, २३ जुलै : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती आधीच जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं होतं की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली होती.
दुसरीकडे केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे आणि त्यामुळे UGCच्या निर्णयावर विचार करण्याची वेळ आली आहे. केरळमध्ये अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य (आर्किटेक्चर), वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला उपस्थित असलेला एक १७ वर्षीय विद्यार्थी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तर मंगळवारीही (२१ जुलै) दोन विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. दरम्यान, केरळ पोलिसांनी परीक्षेला बसलेल्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांविरोधात सोशल डिस्टन्सिगच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
याच घटनेमुळे राज्य सरकारने पुन्हा युजीसीच्या निर्णयावर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून परीक्षा न घेण्याची भूमिका मांडली जात आहे. याच भूमिकेवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोर दिला आहे. केरळमधील घटनेचा संदर्भ देत “केंद्र सरकारनं भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा,” असं आवाहन सामंत यांनी केलं आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. केरळमध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहीजणांना करोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्ताचा हवाला देत सामंत यांनी हे ट्विट केलं आहे. “आता केंद्र सरकार अजून कसली वाट बघत आहे. कर्नाटक (परीक्षा केरळ सरकारनं घेतली आहे. ट्विटमध्ये चुकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.) सरकारनं घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली असं पुढे आले आहे. केंद्र सरकारनं भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा,” असं आवाहन सामंत यांनी परीक्षासंदर्भात केंद्राकडे केले आहे.
News English Summary: The Maharashtra government is proposing not to take the exam. State Minister for Higher and Technical Education Uday Samant has emphasized on this role. Referring to the incident in Kerala, Samant has appealed to the central government to stop the game being played with the lives of future generations.
News English Title: Higher Education Minister Uday Samant Appeals Centre To Cancel University Exam News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL