2 May 2025 7:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली

Heavy rains, Kolhapur, NDRF squads dispatched

कोल्हापूर, ६ ऑगस्ट : कोल्हापुरात सध्या पावसाचा कहर सुरु असून कोल्हापूर शहराशी जोडणारे अनेक रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने यावर नियंत्रणासाठी शहरात एनडीआरएफच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, केर्ली ते केर्ले दरम्यान स्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग काही काळ बंद झाला होता, मात्र पाणी ओसरु लागल्याने तो पुन्हा सुरु झाला आहे. तरी ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे-बंगळूरुन राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यासाठी शिये फाटा हा एक मार्ग आहे. तेथे कसबा बावडा ते शियेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अर्धा फूट पाणी आले आहे. त्यामुळे कसबा बावड्याकडे जाणारा रस्ता हनुमान नगर, शिये याठिकाणी वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा-दोनवडे येथे रस्त्यावर पाणी आले आहे. मात्र, तरीही या धोकादायक स्थितीत या मार्गावर वाहनधारक, लोकांची वर्दळ सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस पाऊस सुरू असून तुलनेने आज पावसाची गती काहीशी कमी झाली आहे. आज सकाळी थोडा वेळ सूर्यदर्शन झाले होते.

जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी पंचगंगेला केवळ दोन फूट बाकी आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फूट २ इंचावर आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर परिसरात दिवसभरात सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून @NDRFHQ च्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना झाली आहेत अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. परिसरात दिवसभरात सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत,अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली.

 

News English Summary: Kolhapur is currently experiencing heavy rains and many roads, dams and bridges connecting Kolhapur city have been submerged. Four units of NDRF have been deployed in the city to control the situation.

News English Title: Heavy rains in Kolhapur two NDRF squads dispatched News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या