1 May 2025 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
x

सुशांतच्या वडिलांनी फार पूर्वीच त्याच्या आईला सोडल्याने त्या डिप्रेशनच्या शिकार होत्या - रिया चक्रवर्ती

Rhea Chakraborty, media interview, Sushant Singh Rajput

मुंबई, २८ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. सीबीआयच्या तपासातून दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती पुढे येत आहे. गेल्या आठवडाभरात सीबीआयनं सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीसह कूक नीरजची अनेकदा चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. या प्रकरणात होणाऱ्या आरोपांवर रियानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. सध्या निर्माण झालेली परिस्थिती मलाही आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं रियानं म्हटलं आहे.

सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यप्रकरणात आता नार्कोटिक्स हा नवीन मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणीदेखील रियावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या आरोपांविषयी तिला काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर बोलत असताना एक बंदूक आणा आणि मला मारून टाका असं ती म्हणाली आहे.

दरम्यान, रियाने मुलाखती बोलताना सुशांत आणि त्याच्या डिप्रेशनबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. रियाने सुशांत डिप्रेशनमध्ये होताच, पण त्याची आईदेखील मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं आहे. तसेच मानसिक आजारामुळेच सुशांतच्या आईचा मृत्यू झाल्याचा रियाने दावा केला आहे.

रिया मुलाखतीत बोलताना म्हणाली की, सुशांतचं आपल्या आईवर फार प्रेम होतं आणि तो त्यांची नेहमी आठवण काढायचा. रियाने यावेळी सुशांतच्या वडिलांबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. रियाने सांगितल्यानुसार, सुशांतचे त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यासोबत फारसे चांगले संबंध नव्हते. कारण त्याचे वडिल फार पूर्वीच त्याच्या आईला सोडून गेले होते. रियाने हेदेखील सांगितलं की, त्यांची आईदेखील कथित रित्या डिप्रेशनची शिकार होती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.’

रियाने पुढे सांगितलं की, ‘सुशांतचं त्याच्या वडिलांशी नातं फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळेच तो जवळपास 5 वर्ष आपल्या वडिलांना भेटला नव्हता. रियाच्या इंटरव्ह्यूवर सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने रिअॅक्शन दिली आहे. ती म्हणाली की, ‘2016 पर्यंत सुशांत अजिबात डिप्रेशनमध्ये नव्हता. मी त्याच्या कुटुंबियांसोबत उभी आहे.’ अंकिताने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘सुरुवातीपासून शेवटपर्यंत, जोपर्यंत सुशांत आणि मी एकत्र होतो, 23 फेब्रुवारी 2016 पर्यंत. त्याला कोणत्याच प्रकारचं डिप्रेशन नव्हतं आणि त्याने डॉक्टरांशीही संपर्क साधला नव्हता. तो पूर्णपणे ठिक होता.’

 

News English Summary: Speaking in an interview, Riya said that Sushant loved his mother very much and he always remembered her. Riya has made a very shocking revelation about Sushant’s father this time. According to Riya, Sushant’s father K. K. He did not have a very good relationship with Singh.

News English Title: Rhea Chakraborty media interview actress says Sushant Singh Rajput mother also suffered from mental illness News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या