10 May 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Total Gas Share Price | तज्ज्ञांकडून BUY कॉल, अदानी टोटल गॅस शेअर फोकसमध्ये, अपडेट नोट करा - NSE: ATGL Adani Green Share Price | 30 टक्के कमाईची संधी, या मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ADANIGREEN Adani Energy Solutions Share Price | 58% परतावा मिळेल, सुवर्ण संधी, अदानी ग्रुपचा शेअर खरेदी करा - NSE: ADANIENSOL Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

भाजप सोडणाऱ्यांची दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही | गिरीश महाजन

BJP MLA Girish Mahajan, NCP Leader Eknath Khadse, North Maharashtra

जळगाव, ३१ ऑक्टोबर: भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार तर सोडा, एकही निष्ठावंत कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही, असा विश्वास आमदार गिरीश महाजन यांनी चोपडा येथे आयोजित शुक्रवारी भाजपच्या बैठकीत व्यक्त केला. जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे.

एका विचारधारेवर पक्ष चालत असून पक्ष वाढविण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे आदी नेत्यांनी खुप मेहनत घेतल्याचे महाजन यांनी सांगितले. मी आहे म्हणून पक्ष असल्याचे म्हणणारे आता इतिहासजमा झाले आहेत. आजही जे भाजप सोडत आहेत, त्यांचीही दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही महाजन यांनी नमूद केले.

खडसे यांच्या मागे अनेक आमदार, पदाधिकारी, खासदार राष्ट्रवादत जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेले तरी भाजपा मधील कोणीही नेते त्यांच्या मागे जाणार नाहीत किंवा त्यांच्या जाण्याने भाजपला ही कोणताही फरक पडणार नाही, अशी वक्तव्ये महाजन, रावसाहेब दानवे यांनी केली होती. यावर खडसे यांनी भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहेत. आज कोणताही मोठा बदल दिसणार नसला तरी आगामी काळात मात्र कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे हे दिसून येईल. पक्षात कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना अशी वक्तव्य करावीच लागतात, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

याचबरोबर त्यांनी माजी मंत्री गिरीष महाजन यांना जबरदस्त इशारा दिला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने भाजपाला काही फरक पडणार नाही असे महाजन यांनी म्हटले होते. यावरून खडसे यांनी माझ्या जाण्याने काय फरक पडतो हे लकरच कळेल. आगामी काळात कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे, हे दिसेल असा इशारा दिला आहे.

 

News English Summary: The BJP is not a person-centered party but a party that has grown on the strength of ordinary workers. BJP is not a party of one person but of party workers. Even if Nathabhau leaves the party due to the increase in the number of activists, no loyal activist will leave the party, let alone MLAs, MPs, MLA Girish Mahajan said at a BJP meeting in Chopda on Friday. In the district, BJP has organized meetings at taluka level.

News English Title: BJP MLA Girish Mahajan criticized Eknath Khadse politics in North Maharashtra News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या